ब्रम्हापुरी शहरालगत असलेल्या उदापूर गावात नागरिकांना पाणीटंचाईला समोर जावे लागत आहे.
ग्रामपंचायत उदापूर ची लोकसंख्या ३०० हजार च्या जवळपास आहे. उदापूर गावात सध्या स्थित २५,२६ हातपंप आहेत २०१३-२०१४ मध्ये ग्रामीण पाणीपुरवठा योजने अंतर्गत नळ योजना करण्यात आली यासाठी शासनाने ४९ लाख ९५ हजार रुपये मंजूर केले. हि योजना २०१४ मध्ये पूर्ण होऊन लोकार्तीत झाली. याच प्रमाणे उदापूर चे हनुमान मंदिर परिसरात सौर उर्जेवर चालणारी सार्वजनिक नळ योजना ५ लाख रुपयाची कार्योन्वीत करण्यात आली कुटुंब संख्या वाढली नळ कनेक्शन वाढले ग्रामपंचायतचे उत्पन्न वाढले परंतु ग्रामपंचायत ने पाण्याच्या प्रश्नाकडे आतापर्यंत लक्ष दिले नाही हनुमान मंदिर परिसरातील सौर उर्जेवर चालणारी सार्वजनिक नळ योजना मार्च २०२१ पासून पूर्णपणे बंद पडली ग्रामीण पाणीपुरवठा योजनेतील नळ योजना ३,३,४,४ दिवस या ना त्या कारणाने विस्कळीत होते वार्ड क्रमांक १ शिवनगर परिसरात पाण्याचा थेंबही पोचत नाही याचा सर्वात जास्त फटका वार्ड क्रमांक १ शिवनगर परिसरातील जनतेला बसतो उन्हाळ्याची वेळ असल्याने सर्वांना पाण्याची गरज आहे.!
या भिषण पाणीटंचाई कड़े ग्रामपंचायत सरपंच तथा पदाधिकारी लक्ष देतील काय.? असा प्रश्न नागरिकांमध्ये गुंजत आहे.
पाणी हे जिवन आहे आपण या समस्ये कडे जागतीने लक्ष घालून तात्काल पाण्याची समस्या सोडवावी. अशी उदापूर च्या नागरिकांची मागणी आहे.