धडाडीचे युवा लोकनेते,भाजपाचे शहर कोषाध्यक्ष आणि श्री एकविरा संस्थान,माळीपूरा कारंजाचे विश्वस्त सत्यजीत उर्फ बंटीभाऊ गाडगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून,त्यांचा,स्थानिक विदर्भ लोककलावंत संघटना, अष्टविनायक कल्चरल ग्रुप,आदर्श जय भारत सेवाभावी संस्था, ईरो फिल्मस् एन्टरटेन्टमेन्ट आणि करंजमहात्म्य परिवाराच्या वतीने, चित्रपट निर्माते डॉ इम्तियाज लुलानिया यांच्या अध्यक्षतेखाली, कल्चरल सेन्सार बोर्ड मुंबईचे रविन्द्र नंदाने गुरुजी,डॉ. ज्ञानेश्वर गरड,नंदकिशोर कव्हळकर, महाराष्ट्र शासन पुरस्कारार्थी संजय कडोळे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रामुख्याने कृष्णराव गाडगे गुरुजी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई गाडगे, विजय पाटील खंडार,रोमिल लाठीया,अतुल धाकतोड,उमेश अनासाने,मयुरेश गाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी धडाडीचे लोकनेते सत्यजीत गाडगे यांच्याशी श्री एकविरा संस्थान सभागृह व वॉल कंपाऊंड बाबत संजय कडोळे यांनी चर्चा केली व आगामी श्री नवरात्रोत्सवापूर्वी सभागृह मंदिराला उपलब्ध होणे जरूरीचे असून, तुम्ही आ.राजेंद्र पाटणी यांचेकडे तसा पाठपुरावा करावा अशी विनंती केली. दि ३ डिसेंबर २०२२ रोजी, संजय कडोळे यांचे द्वारे आयोजीत विदर्भ कलावंत संघटनेच्या भव्य अशा जाहीर मेळाव्यात,व्यासपिठावरून बोलतांना, "श्री एकवीरा माता संस्थान येथे भव्य सभागृह मंजूर करीत असल्याचे" स्थानिक आमदार राजेंद्र पाटणी यांनी सांगीतले होते. हे येथे उल्लेखनिय आहे. तेव्हा सदर्हू सभागृहाचे भूमिपूजन केव्हा होणार याकडे कारंजेकरांचे लक्ष्य लागले असल्याचे संजय कडोळे सत्यजीत गाडगे यांचेशी बोलतांना म्हणाले.