कारंजा (लाड) : मागील आठवड्यातील रिमझिम पावसानंतर शेतकऱ्यांनी आप आपल्या शेतशिवारात पेरणीला सुरुवात केलेली होती.परंतु गेल्या चार दिवसा पासून परिसरात पाऊसच नसल्याने आणि वातावरणातील उष्णतेमुळे शेतातील पिके कोमजून पेरण्या उलटतात की काय अशी भिती वाटत असल्याने, शेतकरी राजा चिंताग्रस्त झाला होता.परंतु रविवार दि. 23 जून 2024 रोजी, दुपारी 04:00 वाजताचे आसपास अर्धा ते एकतास चांगला पाऊस बरसल्यामुळे पिकांना नवसंजिवनी मिळणार आहे.त्यामुळे शेतकरी राजा समाधान व्यक्त करीत आहे. तर दुसरीकडे आज कारंजा येथे रविवार बाजार भरलेला असल्यामुळे ग्रामिण भागातील शेतकऱ्यांसह,शहरवासीयांची व्यापारी प्रतिष्ठाने आणि बाजारामध्ये चांगलीच गर्दी होती. मात्र अचानक आलेल्या पावसाने, छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांची धांदल उडाल्याचे दिसून आले तर बाजारात साचलेल्या चिखलाने आणि पावसाने लघु व्यावसायिकांच्या मालाचे नुकसान झाले.तर बाजाराला आलेल्या ग्राहकांना चांगलेच चिंब भिजण्याची वेळ आली.असे वृत्त आमचे प्रतिनिधी संजय कडोळे यांनी कळवीले आहे.