अकोला:- वैशाख महिन्यात नागपुरला असह्य उन असतं. नागपुरलाच काय पण संपुर्ण विदर्भात उन्हाचे
तांडव सुरु असतं. आजपासुन वैशाख महिना
सुरू झाला की आषाढ? काही कळतचं नाही.
बाकी आम्हा नागपुरकरांच या प्रखर उन्हावर
फार प्रेम आहे हं. म्हणून आम्ही नागपुरकर
लोकांना प्रखर उन्ह अनुभवायला नागपुरला
बोलवत असतो. “
“ या या....वैशाख आलेला आहे “
“ पोपटी चैत्रपालवी गर्द होउ पाहतेय”
“ गळून पडलेली सुके पाने मातीत
मिसळु पाहताहेत”
“गरम वारा व धुळ यांचे द्वंद सुरू आहे “
“गरम इतके की पाणीही खोल जमिनीत
जाउन सावली शोधतेय “
“तलावांच्या काठाचा व्यास कमी होतोय”
“ कडूनिंबाची दाट सावली वाटसरूंना
थंड झुळूक देतेय. “
या वरच्या साऱ्या अफवा आहेत की काय?
हे सारं नागपुरकर सांगतात ते सारे खोटं
पाडलं की हो या पावसाने
नागपुरात प्रखर उन्ह अनुभवायला आलेल्या
मंडळींची नव्हे पर्यटकांची या पावसाने
“””” घोर निराशा “”””
केली. उन्हामधे अडकायचे होते पर्यटकांना तर
दणादण पावसात अडकले.
आईसक्रीम, उसाचा रस, टरबुजाची मज्जा
घ्यायची होती सर्वांना तर काढा प्यायची
वेळ येते की काय? ही धास्तीच जास्त!!!!
काही ही म्हणा आज नागपुरात पर्यटकांची
“ घोर निराशा “ झाली
काळे ढगं एकमेकांवर आदळत आहेत!
सरींचं रुपांतर गारांमधे होत आहे!
रस्त्यावर धावणाऱ्या धुळीवर पावसाच्या
वाहणाऱ्या पाण्याने मात केली आहे.
हो…. “ घोर निराशा “ झाली आहे
मंगल बाळ
नागपुर
“
आपल्या प्रतिक्रिया द्या....