वाशिम(जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : दि २३ जून पासून, हवामानात बदल होऊन,विदर्भात तुरळक पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र जमिनीची तहान भागून, जोपर्यंत पुरेसा पाऊस येऊन जमिनीत पाणी मुरणार नाही. तोपर्यंत शेतकर्यांनी आपल्या शेतात पिकांची पेरणी करू नये. अन्यथा शेतकर्यांवर दुबार पेरणीची वेळ येऊ शकते म्हणून शेतकर्यानी पेरणीची काळजी घेण्याचा सल्ला कृषी तज्ञांकडून देण्यात आलेला आहे . त्याच प्रमाणात शक्यतोवर पेरणी करतांना, कृषी तज्ञाच्या सल्ल्याने, कमी पावसात व कमी दिवसात निघणाऱ्या पिकांचीच निवड करावी. बि बियाणे खरेदी करतांना, संबधित कृषी केन्द्रा कडून ( दुकानदाराकडून) बि बियाणांचे पक्के बिल घ्यावे. बि बियाणांचे पाकिट किंवा बॅग सिल असलेल्या भागा कडून न फोडता विरुद्ध भागाकडून फोडावे. व पेरणीनंतर सांभाळून ठेवावे. म्हणजे बियाणे न उगवल्यास संबधित दुकानदाराला जाब विचारता येईल तसेच पिक विमा काढून घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे .