वाशिम: अमरावती शिक्षक मतदार संघाचे आमदार किरणराव सरनाईक यांच्या वाहनाचा अकोला जिल्ह्यातील पातूर येथील उड्डाण पुलाजवळील शिगर नाल्याजवळ अपघात झाला असून या अपघातात सहा जण जागीच ठार झाले असून इतर काही जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
या वाहनामध्ये अमरावती शिक्षक मतदार संघाचे आमदार किरण सरनाईक यांचे बंधु श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुणराव सरनाईक यांचा मुलगा रघुवीर सरनाईक वय २८आणि मुलगी शिवानी (सरनाईक) आमले वय ३० वर्ष रा.नागपूर आणि नात कु अस्मिरा अजिंक्य आमले (वय ९ महिने)इत्यादी व्यक्ती अकोल्या वरून वाशिमकडे येत असताना विरुद्ध दिशेने वेगाने येणाऱ्या चार चाकी वाहना सोबत आमने सामने जोरदार धडक बसली. हा अपघात एव्हढा भीषण होता की दोन्ही वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला आहे.
या अपघातात आ. किरणराव सरनाईक यांचे बंधू प्राचार्य अरुणराव सरनाईक यांचा मुलगा रघुवीर सरनाईक (वय २८ वर्षे ), शिवानी (सरनाईक) आमले ( वय ३० वर्षे )कु अस्मिरा अजिंक्य आमले (वय ९ महिने ।यांच्या सह दुसऱ्या वाहनातील अकोला जिल्ह्यातील आस्टूल गावातील सिद्धार्थ यशवंत इंगळे , आणि ठाकरे या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. तर श्रेयश सिद्धार्थ इंगळे, पियुश देशमुख, सपना देशमुख इत्यादी काहीजण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. यापैकी आणखी एकाचा मृत्यु झाल्याचे वृत्त आहे. हा अपघात पातुर नजीक झाल्याने अपघाताचे वृत्त लवकरच परिसरात पसरले लगेच गावकरी मंडळींनी धावाधाव करून पोलीस स्टेशन पातुरला वृत्त कळवीत जखमींना अकोला येथे उपचार्थ हलविण्याकरीता संबंधित रुग्नवाहिकांना मदत केली. त्यामुळे पोलीस विभागाकडून चौकशी पंचनामा सुरु असून, बाकी जखमींवर जिल्हा रुग्नालय तसेच इतर रुग्नालयात उपचार सुरू असल्याचे कळते.सध्या वाशिम ते अकोला महामार्ग रस्ता रुंदीकरणाचे चारपदरी रस्त्याचे काम सुरू असून काहीठिकाणी मात्र वनवे प्रमाणे अरुंद रस्ता असल्याचे सांगीतले जात असून,पातूरचा घाट अत्यंत कठीन घाट म्हणून ओळखला जात असतांना अशा धोकादायक रस्त्यावरून वाहने चालवितांना प्रत्येक वाहन धारकांनी वेगमर्यादा नियंत्रणात ठेवून वाहने चालवायला हवी आहेत.तसेच प्रखर उन्हामध्ये डोळ्यावर अंधारी येण्याची आणि समोरील वाहनच समोरासमोर येईपर्यंत न दिसण्याची शक्यता असू शकते त्यामुळे अशा स्थितित प्रत्येक वाहनांच्या चालकांनी चाणाक्ष नजरेने समोरच्या वाहनाच्या वेगाचा अंदाज घेऊन आपली वाहने चालविल्यास अशा दुदैवी घटना टाळता येऊ शकतात. असे बोलले जात असून या वृत्तामुळे आमदार किरणराव सरनाईक मित्रमंडळ वाशिम, अकोला, अमरावती, कारंजा (लाड) तसेच श्री शिवाजी शिक्षण प्रसारक संस्था वाशिम रिसोड यांचेमध्ये शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. असे वृत्त मिळाल्याचे आमचे प्रतिनिधी संजय कडोळे यांनी कळविले.