वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आद्य क्रांतिकारक क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज ३ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आयोजित कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी कैलास देवरे यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण केला.