परिस्थितीने १००% दारिद्री आणि शरिराने ८५% दिव्यांग असतांनाही,गेल्या चाळीस वर्षापासून निस्पृह समाजसेवा, परखड साहित्यलेखन, राष्ट्रिय कार्यक्रमाची व शासनाच्या विविध योजनांची जनजागृती,निर्भिड पत्रकारिता करणारे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे संजय महाराष्ट्र शासनाच्या "राष्ट्रपिता व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराने" सन्मानित असलेले, संजय मधुकरराव कडोळे हे निराधार व बेघर आहेत. श्री कामाक्षा देवी संस्थान कारंजाच्या आश्रयाने ते पिढ्यानपिढ्या राहत असून, जुने पड़के, तुटके झोपडीवजा घरात ते राहतात. पावसाळ्यात घरात पाणीच पाणी साचते. उदरनिर्वाहाचे कोणतेच ठोस साधन नाही. श्री कामाक्षा देवी मंदिराच्या आश्रयाने राहत असल्यामुळे, शासनाच्या प्रधानमंत्री घरकुल योजनेमधून सुद्धा कारंजा नगरपालिकेने त्यांना अपात्रच ठरवीले आहे. परंतु तरीही खचून न जाता, ते प्रामाणिकता, मनमीळाऊपणा, विश्वासार्हता आणि स्वच्छंदी जीवनच जगत असतात. आपल्या जीवनात जास्तित जास्त समाजसेवेला आणि दिव्यांगकल्याणाला त्यांनी महत्व दिले आहे.
आज भारतिय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरु असल्यामुळे त्यांनी आपल्या झोपडीवजा घरात, देशभक्तिच्या आनंदाने, राष्ट्रध्वज तिरंग्याचे सन्मानपूर्वक व शासकिय नियमाचे पालन करीत, शनिवार दि.१३ ऑगष्ट २०२२ रोजी, आपला चिमुकला पुतण्या चि. अथर्व कमलेश कडोळे यांचे, ध्वजस्तंभाचे पूजन व श्रीफळ फोडून ध्वजारोहण केले. त्यानंतर ध्वजाला अभिवादन करून, सामुहिक राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले. यावेळी त्यांच्या वयोवृद्ध मातोश्री दुर्गाबाई मधुकरराव कडोळे, कु. समृद्धी कमलेश कडोळे व घराजवळ्चे शहनाज अजगर शहा, सिमरन अजगर शहा इ मुस्लिम शेजारी मुले मुली उपस्थित होते. त्यानंतर शेजारच्या लहान मुलांना अल्पोपहाराचे वितरण करण्यात आले. झोपडीतही संजय कडोळे यांनी भारताचे दर्शन घडविल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....