पुणे दि. बहुजन समाजाचे उद्धार करते आणि आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त कोल्हापूर येथे शाहू महाराज या महामानवाच्या स्फुर्तिस नतमस्तक होण्यासाठी बहुजन जनता दलाच्या वतीने कोल्हापूर ते पुणे संवाद अभिवादन रॅलीचे आयोजन पंडित भाऊ दाभाडे बहुजन जनता दल संस्थापक अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली रविवार दिनांक 26 जुन 2022 रोजी करण्यात आले आहे
संवाद अभिवादन रॅली पुणे रेल्वे टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून मनपा भवन, बालगंधर्व,चौक अलका टॉकीज चौक, दांडेकर फुल, सिंहगड रोड, वडगाव ब्रिज, नवले ब्रिज, शिवापूर. टोल नाका, सातारा उम्रंज फाटा, कराड ,पेठ या मार्गाथ कोल्हापूर येथे दुपारी २ वाजता पोचणार असुन संवाद अभिवादन रॅलीचे स्वागत , स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व छत्रपती संभाजी महाराज हे करणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे तर प्रमुख उपस्थिती मा,संदेश (डॉआंबेडकरांचे पणतू) श्रीमती सावित्रीबाई साठे (लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची सून) मा, राजाराम फुले,(मा ज्योतिबा फुले यांचे पणतू) केशवराव मालुसरे (तानाजी मालुसरे यांचे पणतू) बहुजन जनता दलाचे माजी नगरसेवक रमेश डोरले, बहुजन जनता दलाचे माजी नगरसेवक केशवराव गंगणे बहुजन जनता दल कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष डॉ दशरथ पुजारी, बहुजन जनता तेल सातारा जिल्हा अध्यक्ष संतोष जुवेकर, बहुजन जनता दल सांगली जिल्हा अध्यक्ष मंगेश कर्णिक, यांच्या सह अनेक मान्यवर आणि बहुजन जनता दलाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत तेव्हा बहुजन जनता दलाच्या संवाद अभिवादन रॅली मध्ये सामान्य नागरिकांनी व बहुजन जनता दल आणि बहुजन जनता दलाच्या महिला आघाडी ,युवक आघाडी ,माजीसैनिक आघाडी , वैद्यकीय कामगार आघाडी, मनपा कर्मचारी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडीत भाऊ दाभाडे यांनी केले आहे