कारंजा (लाड): कारंजा नगरीतील,गोंधळीनगर मध्ये असलेल्या पुरातन,ऐतिहासिक जगप्रसिद्ध शक्तीपिठ श्री कामाक्षा देवी संस्थान कारंजा येथे शारदिय नवरात्रोत्सवा निमित्ताने सोमवार,दि. 21 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी 06:00 वाजता गोंधळ्याच्या वाद्यवृंद संगतीच्या तालावर महाआरती होऊन भव्य महाप्रसाद संपन्न झाला.
असता हजारो कारंजेकरांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. महाप्रसादासाठी संस्थानची विश्वस्थ मंडळी,पुजारी,गोंधळी आणि कारंजकर भाविक मंडळीनी अथक परिश्रम घेतले. मातृशक्ती उपासक,मातृ भाविकांच्या तनमनधनाने मिळणाऱ्या अथक अशा सहकार्याबद्दल आद्यशक्ती श्री कामाक्षा देवी संस्थानने आभार मानले.