कारंजा : भारतिय प्रजासत्ताक दिनाच्या ७३ व्या वर्धापनदिनानिमित्ताने, सालाबादप्रमाणे यंदाही, गुरुवार दि.२६ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ९ : १५ वाजता, कारंजा तहसिल कार्यालयाचे प्रांगणात, तहसिलदार तथा प्रभारी उपविभागीय अधिकारी धिरज मांजरे यांच्या शुभहस्ते, शहरातील मुख्य शासकीय ध्वजारोहण व ध्वजवंदन होणार आहे. तरी कार्यक्रमाला शहरातील सर्वच राजकिय पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते, साहित्य, कला, क्रिडा,सामाजिक, शैक्षणीक संस्थाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी, पत्रकार मंडळीनी उपस्थित रहावे असे निमंत्रण पत्रिकेद्वारे महसूल विभागाचे नायब तहसिलदार राजेश ढोंबळे, निवडणूक विभागाचे नायब तहसिलदार विनोद हरणे तथा नि. नायब तहसिलदार विकास शिंदे यांनी पत्रकार परिषदेला कळवीले असल्याचे संजय कडोळे यांनी वृत्त दिले आहे.