भद्रावती- भद्रावती तालुक्यातील ढोरवासा केंद्राची अंतिम शिक्षण परिषद गटशिक्षणाधिकारी मा. श्री. डॉ. प्रकाशजी महाकाळकर साहेब यांच्या प्रेरणेने कर्मवीर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, गवराळा येथे नुकतीच संपन्न झाली.
यात कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून शाळेचे प्राचार्य श्री डी. डी. डोहतरे सर तर प्रमुख मार्गदर्शक मा.श्री.भारतजी गायकवाड, केंद्र प्रमुख ढोरवासा सुलभक म्हणून सौ. मेघा शेंडे मॅडम, गवराळा
सौ.प्रिया मसराम मॅडम, गवराळा
श्री. यशवंत पिंपळकर सर, देऊळवाडा हे लाभले होते. प्रमुख पाहुणे म्हणून कु. नाकाडे मॅडम, मु.अ.कुनाडा,
प्रतिभा कवाडे मॅडम,BRC भद्रावती
रत्नमाला दुपारे मॅडम,BRC भद्रावती हे मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन
मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून झाली
मा.केंद्र प्रमुख भारतजी गायकवाड यांच्या हस्ते माझी शाळा स्वच्छ व सुंदर शाळा स्पर्धेत तृतीय क्रमांक आल्याबद्दल श्री. दोहतरे सर क.वि.गवराळा यांचा व उत्कृष्ट प्रशासन सांभाळल्या बद्दल श्री.दिनकर गेडाम सर, ढोरवासा यांचा सत्कार करण्यात आला.
शिक्षण परिषदेचे प्रास्ताविक मा. केंद्र प्रमुख श्री. भारत गायकवाड सर यांनी केले. शिक्षण परिषदेची रुपरेषा व प्रशासकीय कामाची माहिती सांगितली.
* तू सर्व जगाचा त्राता रे, तू कला बुद्धीचा दाता रे या गीतातून वातावरण निर्मिती केली.
सन्माननीय श्री.दोहतरे सर यांनी सुयोग्य मार्गदर्शन केले.
त्यानंतर शाळा पूर्व तयारी व नवीन शैक्षणिक वर्षाची तयारी बाबत पत्राचे वाचन तसेच केंद्र प्रमुख मिटींगची माहिती श्री.दिनकर गेडाम सर यांनी सुयोग्य शब्दात सांगितली.
शिक्षण परिषदेच्या पहिल्या पुष्पाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मा.श्री. वसंत जांभूळे सर यांनी केले.
त्यानंतर मार्गदर्शन सौ. मेघा शेंडे मॅडम, गवराळा यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या मार्मिक शब्दांनी सुरूवात
करून माहितीचा अधिकार अधिनियम 2005 क्र.22 मधील प्रारंभिक महत्वाच्या बाबी याची विस्तृत माहिती सहज सोप्या भाषेत समजावून दिली. दुसरे सुलभक सौ. प्रिया मसराम मॅडम, गवराळा यांनी माहितीचा अधिकार आणि सार्वजनिक प्राधिकरण यांची विस्तृत माहिती सांगितली. तसेच श्री. यशवंत पिंपळकर सर, देऊळवाडा यांनी केंद्रीय माहिती आयोग यावर सविस्तर माहिती शिक्षकांपर्यंत पोहोचवली.
वंदे मातरम् म्हणून शिक्षण परिषदेची सांगता करण्यात आली.
आपल्या प्रतिक्रिया द्या....