आयुष मंत्रालय भारत सरकार कडून योग संगम अभियानांतर्गत देशांमध्ये एक लाख आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 सादर करण्यात आला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशाखापट्टणम् येथून कॉमन योगा प्रोटोकॉल सेशन सादर करून आंतरराष्ट्रीय योग दिवस 2025 सादर केला. राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ आयुष्य मंत्रालय भारत सरकार पुरस्कृत वनस्पतीशास्त्र विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथील पश्चिम विभागीय औषधी वनस्पती सह-सुविधा केंद्राद्वारे 21 जून 2025 रोजी पश्चिम विभागातील सहा ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिवस सादर केला व उपस्थितांना औषधी वनस्पती रोपे वाटप करण्यात आली. *औषधी वनस्पती सह-सुविधा केंद्र व महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे विद्यापीठ हायस्कूल* यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख प्रा. (डॉ) मिलिंद सरदेसाई यांनी योग दिनाचा इतिहास व वनस्पतींशी एकरूप असलेला निसर्ग याबद्दल मार्गदर्शन केले. योगाचार्य ओमश्री आचार्य शिव यांनी विद्यार्थ्यांना स्वतःवर कसे लक्ष केंद्रित करायचे यासाठी प्राणायाम तसेच अनुलोम व विलोम, अधोमुख विश्राम आसन, शीर्षासन व सर्वांगासन याविषयी प्रात्यक्षिक करून मार्गदर्शन केले. केंद्राचे प्रमुख प्रा. (डॉ) दिगंबर मोकाट यांनी योग संगम अंतर्गत आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व विशद केले.सर्वांना औषधी वनस्पतीची ओळख व माहिती करून दिली. तसेच गुळवेल, सीताअशोक, नागकेशर, आवळा, कडुलिंब इत्यादी रोपे देऊन स्वागत केले. याप्रसंगी विद्यापीठ हायस्कूलचे मुख्याध्यापक विष्णू मोरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर स्नेहा वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले. केंद्राकडून विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता शांती मंत्राने करण्यात आली. शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. केंद्रातील तांत्रिक अधिकारी संध्या देवरे,श्रुतिका गोडसे यांचे कार्यक्रमास सहकार्य लाभले.