मौजा.अऱ्हेरनवरगाव येथील रहिवासी नामे सुजित नंदनवार याने आपले घराचे अंगणामध्ये दिनांक ३१/७/२०२३ रोजी ठेवलेली मोटार सायकल दिसत नसल्याने गावात चौकशी केली . त्यावरून गावातील रवींद्र ठेंगरे आणि नरेंद्र वैद्य यांनी सांगितले की , दोन पगडी लावलेले इसम ब्रम्हपुरीच्या दिशेने डबलशिट बसून गेले आहेत . त्यानंतर ब्रह्मपुरी येथे येऊन फिर्यादी नामे सुजित नंदनवार याने मोटार सायकलचा शोध घेतला असता मोटार सायकल मिळून न आल्याने त्याने पो. स्टे ब्रम्हपुरी येथे तक्रार नोंदविली . तक्रार प्राप्त होताच ब्रम्हपुरी पोलिसांनी तपासाचे चक्रे फिरवीत मोठ्या शिताफीने आरोपी नामे १) कुलदीपसिंग जर्नेलसिंग अंधरेल वय २३ वर्ष , २) कुंदनसिंग जर्नेलसिंग अंधरेल वय १९ वर्ष , या दोन आरोपींना अटक केली आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र उपरे करीत आहेत.