वाशिम : लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष मातंग समाजाचे नेते विष्णू भाऊ कसबे हे पुणे ते नागपूर पायी चालत पदयात्रा करत आहेत.ही त्यांची 5 वी पदयात्रा आहे. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव, जऊळका,काळामाथा, किन्हि राजा,लाठी,हिंरगी,शेलुबाजार ,तराळा, या संपूर्ण गावामध्ये त्यांच्या पदयात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले, मातंग समाजाला अ. ब. क. ड वर्गीकरण करून स्वातंत्र्य आरक्षण मिळावे. साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा.बार्टीच्या धर्तीवर आर्टि ची स्थापना व्हावी.
पुण्यातील क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे राष्ट्रीय स्मारकाचे लवकरात लवकर काम चालू करावे.मुंबई विद्यापीठाला साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्यावे. या व अन्य मागण्या करीता मातंग एकवटला आहे. तसेच ही पदयात्रा दि .13 डिसेंबर 2023 ला उग्र व आक्रमक मोर्चाच्या स्वरूपात यशवंत स्टेडियम नागपूर येथे भव्य स्वरूपात धडकणार आहे. सर्व मातंग समाजाने दि . 13 डिसेंबर 2023 ला मातंग समाजाच्या न्याय हक्कासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे.असे आवाहन वाशिम जिल्ह्यातील पदाधिकारी कैलासभाऊ थोरात लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र महासचिव,वाशिम जिल्हा कार्याध्यक्ष शंकर पाटील खंडारे, लहुजी शक्ती सेना माजी युवा जिल्हा अध्यक्ष रामदास आव्हाडे. यांनी केले आहे.