श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस दरवर्षी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोठया आनंदोत्साहात साजरा करण्यात येत असतो, त्यानुसार दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी,दि १० मे रोजी,सकाळी १० : ०० वाजता डाॅ, बाबासाहेब आंबेडकर चौकात श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या वाढदिवसा निमित्त ६२ किलोचा केक कापन्यात येईल,तसेच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त,सिद्धार्थ बुद्ध विहार गौतमनगर कारंजा येथे,गरजु नेत्ररुग्नांकरीता कॉम्प्युटर प्रणालीव्दारा मोफत नेत्र तपासनी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, नेत्र चिकित्सक डॉ, मोरखडे (लढढा हाॅस्पिटल अकोला) यांच्या प्रमुख मार्गदर्शनात नेत्र तपासणी शिबीर घेण्यात येईल.
तसेच शासकीय हाॅस्पिटल कारंजा येथिल रुग्णाना फळ वाटप करण्यात येईल, त्याचप्रमाणेअनाथ अपंग व गरजूवंत विद्यार्थी यांना शालेय साहित्य वाटप करून कार्यक्रमाची सांगता करन्यात येईल, करीता वंचित बहूजन आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना सुचित करन्यात येत आहे की, आपण सर्वांनी न चूकता सकाळी दि . १० मे रोजी सकाळी १०:०० वाजता डाॅ बाबासाहेब आंबेडकर चौक कारंजा लाड येथे हजर राहावे व नेत्र तपासणी करीता सिध्दार्थ बुद्ध विहार गौतम नगर येथे उपस्थित राहावे असे आवाहन,आयोजक वंचित बहूजन आघाडी तालुका कार्यकारिणी व कारंजा शहर कार्यकारिणी तसेच सर्व सर्कल ग्राम शाखा यांच्या वतीने करण्यात आल्याची माहिती दिलीपभाऊ रोकडे यांनी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना दिली आहे .