नागपूर : "नाट्य परिषदेने,नाट्य कलावंतानी राज्यातील नाट्यगृह,नाटक व रसिक श्रोत्यांना केन्द्रस्थानी ठेवून नाट्य रसिकांकरीता अविरत कार्यरत असलं पाहीजे." त्याचप्रमाणे "आजपर्यंत नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेत काय झाले यावर व्यर्थ चर्चा न करता पदाधिकार्यांनी नाट्य रसिकांचा विचार केला पाहिजे." असे स्पष्टपणे ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी आपल्या संभाषणातून नाट्य कलावंताना निक्षून सांगीतले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, नुकतीच महाराष्ट्रात अखिल भारतिय मराठी नाट्य परिषदची निवडणूक पार पडली. यात विदर्भातील प्रत्येक जिल्हयातील निवडणूकीतील राजकारण सुद्धा प्रचंड गाजले.
व ठिकठिकाणी झालेली निवडणूक प्रचंड चुरशीची ठरली व अखेर नियामक मंडळावर वाशिम जिल्ह्यातून सलग दुसर्यांदा नंदकिशोर अंबादास कव्हळकर व उज्वल दत्तात्रय देशमुख हे प्रचंड बहुमतांनी निवडून गेले.तर नागपूर येथून नरेश गडेकर, प्रफुल्ल फरकसे, संजय रहाटे, अमरावती येथून अँड प्रशांत देशपांडे, अकोला येथून गीताबाली उणवणे इत्यादी निवडून गेले या सर्वांचा सत्कार सोहळा नागपूर येथील श्रीमंत बाबुराव धनवटे रंग मंदिरात, विदर्भ गौरव प्रतिष्ठान तथा आखिल भारतिय नाट्य परिषद शाखा नागपूरच्या वतीने, अध्यक्ष गिरीष गांधी यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य पाहूणे ज्येष्ठ अभिनेते चित्रपट निर्माते प्रशांत दामले यांच्या अध्यक्षते खाली आयोजीत करण्यात आला होता. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून नागपूर विधान परिषदेचे आमदार अभिजीत वंजारी तथा माजी आमदार गिरीष व्यास उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित नियामक मंडळ सदस्यांचा शाल पुष्पगुच्छ व मानपत्र देऊन भव्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष गिरीष गांधी यांना नाट्य परिषद अबाधित राखण्या करीता व नाट्यचळवळीला चालना देण्याकरीता नाट्यकलावंताना उत्कृष्ट मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रुपाली कोंडेवार (मोरे) यांनी केले.असे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेकडे कार्यक्रमाला उपस्थित करंजमहात्म्यच्या प्रतिनिधींनी दिले आहे.