राष्ट्रीय ओबीसी महासंघ पुरस्कृत राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन 19 नोव्हेंबर रोजी संतनगरी शेगाव जिल्हा बुलढाणा येथे संपन्न झाले. या अधिवेशनात ईशान्य जगदीश भोयर यांची गडचिरोली जिल्हा राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी ईशान्य भोयर यांना नियुक्तीपत्र व ओबीसी दुपट्टा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नागपूर विभागाचे शिक्षक आमदार श्री सुधाकरजी अडबाले राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शेषराव येलेकर, जिल्हाध्यक्ष दादाजी चूधरी, जेष्ठ मार्गदर्शक दादाजी चापले, ओबीसी कर्मचारी अधिकारी संघटनेचे अध्यक्ष श्याम लेडे, सरचिटणीस अनिल नाचपल्ले मंचावर उपस्थित होते. त्यांच्या निवडीबद्दल गडचिरोली जिल्हा राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष राहुल भांडेकर, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्याध्यक्ष विनायक बांदूरकर उपाध्यक्ष पांडुरंग घोटेकर, सचिव प्रा. देवानंद कामडी, कोषाध्यक्ष डॉ. सुरेश लडके, संघटक सुरेश भांडेकर, चंद्रकांत शिवणकर , महिला अध्यक्ष संगीता नवघडे ,शहराध्यक्ष सोनाली पुण्यपवार इत्यादींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.