कारंजा (लाड) : कारंजा येथील दिव्यांग सेवक संजय कडोळे यांना ना कौटुंबिक सहारा,ना अपत्य,ना जमीन जुमला -शेतीवाडी,ना व्यवसाय, ना स्वतःला राहण्याचे घर,ना कमाईचे कोणतेच साधन,नेतृत्व अष्टपैलू, वेड समाजसेवेचे,ध्यास तळागाळातील लोकांच्या न्यायहक्काचा, दिव्यांग,अनाथ निराधारांच्या मदतीचा.दारू गांजा व्यसनमुक्तिचा,आवड सामाजिक पत्रकारितेची,लोककला गोंधळ जागरण,लोकगीते,आख्यान, प्रवचनाची .आदर्श छत्रपती शिवराय,शाहू,फुले, गाडगेबाबा,डॉ बाबासाहेब,अण्णाभाऊ साठे, सिंधुताई सपकाळ यांचा. वसा कामाशिवाय कुणाकडे जायचे नाही.हवे तेवढेच वृत्तपत्र छपाईला लागणारे पैसे घ्यायचे. पत्रकारितेचा छंद जपून इतर पण गरीबांना मदत करायची. गोंधळ जागरण लोककलेतून काही उत्पन्न मिळालेच तर अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती निर्मूलन व काही अनाथांना दरवर्षी नित्यनेमाने स्वखर्चाने तिर्थक्षेत्रांची वारी करून आणायचे. त्यांच्या या स्वभावाने ते हिंदू, मुस्लिम, शिख, जैन, बौद्ध, बंजारी अशा सर्व धर्मियांचे लाडके आणि आवडते दिव्यांग समाजसेवक म्हणून ओळखले जातात. अनेक वेळा रक्तदान, अन्नदानाची तर त्यांना आवडच होती . देहदानाचा संकल्प केलेला अशा स्वभावामुळे त्यांचा वाढदिवस दरवर्षी त्यांचे सर्वधर्मिय मित्रमंडळ, सामाजीक उपक्रम करीत मित्रांच्या मदतीने साजरे करीत असतात. याहीवर्षी दि.27 जुलै रोजी, "भव्य असा नेत्रपासणी चिकित्सा व आरोग्य शिबीराचा कार्यक्रम मित्रमंडळाने आयोजीला होता.परंतु अचानक त्यांच्या अनाथ काकांचा मृत्यु झाला.आधीच ८५% दिव्यांग असलेले, पाय मोडल्याने, रॉड टाकून शस्त्रक्रिया झालेले, संजय मधुकरराव कडोळे यांची प्रकृती खालावली.आधी मलेरिया नंतर टायफाईड त्यामुळे थंडीने फणफणत घरातच पडले. परंतु त्यांच्या मित्राकडून राहवले नाही. काही मित्रांनी आर्थिक मदतही देऊ केली. परंतु कुणाकडून एकही रुपया न घेता त्यांनी आजारातही स्वाभिमानी बाण्याने स्पष्टपणे नाकारली. त्यांना भेटणाऱ्या त्यांच्या चाहत्या मित्रामधे प्रामुख्याने वैदर्भिय नाथ समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ पवार,महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे अध्यक्ष आरिफभाई पोपटे, कारंजा पत्रकार मंचाचे अध्यक्ष दिलीप पाटील रोकडे, अखिल भारतिय नाटय परिषद मुंबईचे नंदकिशोर कव्हळकर, शिवसेना शहर प्रमुख गणेश बाबरे, भाजपा शहर अध्यक्ष (वर्गमित्र) ललित चांडक, गुरुदेव नागरी सहकारी बॅकेचे व्यवस्थापन(वर्गमित्र)अतुल धाकतोड, बिएन्डसी चे माजी अधिकारी पांडूरंग माने,मोहित जोहरापूरकर, द्वारकामाई संगीत मैफिलचे डॉ कुंदन श्यामसुंदर, ज्ञानेश्वर खंडारे, परिट समाज संघटनेचे देविदास नांदेकर, शिंपी समाज संघटनेचे सुनिल गुंठेवार, अ भा गुरव समाज संघटनेचे अध्यक्ष विजय खंडार, पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते इंजि. विलास राऊत, चाँदभाई मुन्निवाले, गवळी समाज संघटनेचे मोहमंद मुन्निवाले, आदिवासी समाज संघटनेचे संजय लोखंडे, गणेश बागडे आदी मित्रमंडळींनी प्रकृती अस्वास्थामुळे "कृपया भेटीला येऊ नका अशी संजय कडोळे यांनी गयावया करूनही त्यांनी सदिच्छा भेट देऊन प्रकृतीची विचारपूस करीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात व लवकरात लवकर तुमची प्रकृती बरी व्हावी अनाथ, दिव्यांग, तळागाळातील समाजाला तुमची नितांत गरज असल्याचे सांगीतले .त्याशिवाय जिल्हयातील शिक्षक आमदार किरणराव सरनाईक, आमदार अमितजी झनक, आमदार खंडेलवार, भाजपा भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नरेंद्रजी पवार, ज्ञानगंगा साहित्य मंडळ परिवारातील कविवर्य आमदार बळवंत बसवंत वानखडे, अ भा मराठी नाट्य परिषद अध्यक्ष, नरेशजी गडेकर, दिनेशजी वाघमारे, वाशिम (पत्रकार)जिल्हा प्रतिनिधी - विश्वनाथकाका राऊत, देशोन्नतीचे माधवकाका अंभोरे, तरुण क्रांती मंचचे जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी, विनोद डेरे, काशिनाथ कोकाटे, सुहास पवार, राजाराम पाटील राऊत, प्रेमकांत राऊत, वाशीम संदेशचे अरुण राऊत,अकोल्याचे शौकत अली मिरसाहेब, संजय शिगनाथ आदींनी फोन मेसेज द्वारे प्रकृतीची विचारपूस करीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात . संजय कडोळे हे आपल्या मित्रमंडळी मध्ये "सुदामा" नावाने प्रचलित असून, अ भा मराठा सेवा समाज प्रणित संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचे जिल्हाध्यक्ष हभप श्रीकृष्ण महाराज राऊत यांनी जिल्हा वारकरी संमेलनात दिलेला पुरस्कार होय. आणि आपल्या सर्वच मित्रमंडळीचा ते श्रीकृष्ण समजून आदर करीत असल्याने जनमाणसात लोकप्रीय ठरत आहेत हे विशेष !
आपल्या प्रतिक्रिया द्या....