पोलीस स्टेशन ब्रम्हपूरी अंतर्गत मौजा मालडोंगरी ते धामनगाव जंगल परीसरात ताशपत्त्यावर पैशाची बाजी लावुन अवैधरित्या जुगार खेळणा-या लोकांवर ब्रम्हपुरी पोलीसांनी छापा टाकला. त्यांचेकडुन नगद रक्कम, मोबाईल, मोटारसायकल ई. वस्तु जप्त करण्यात येऊन त्यांचेविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
दि. ०५/०५/२०२२ रोजी दुपारी ब्रम्हपुरी पोलीसांना गोपनिय माहीती मिळाली. कि, मौजा मालडोंगरी ते धामनगाव रोड लगतच्या जंगल परीसरात काही लोक ताशपत्त्यावर पैशाची बाजी लावुन अवैधरित्या मोठा जुगार खेळत आहेत. त्यावरून ब्रम्हपुरी पोलीसांनी आपली ओळख लपवुन सदर ठिकाणी खाजगी वाहनाने जावुन रेड टाकली. पोलीसांना पाहुन जुगार खेळणारे पळण्याचा त्यांचे ताब्यातुन एकत्रितरित्या ४१,३२०/- रु. नगद रक्कम ५ मोबाईल एकुण किंमत ६५,०००/- रु.४ मोटारसायकल किंमत २,३०,०००/- रु. व ५०/- रू. ताशपत्ते असा एकुण ३,३६,३७०/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार खेळणा-यांना पोस्टेला आणुन त्यांचेवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदरची कार्यवाही श्री. मिलींद शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी, ब्रम्हपुरी व पोलीस स्टेशन ब्रम्हपुरीचे ठाणेदार रोशन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रशांत ठवरे, पोउपनि मोरेश्वर लाकडे, स्वप्नील गेडाम, सहा. फौज/ विलास गेडाम, पोहवा/ अरुण पिसे, नापो / तेजराम जनबंधु, उमेश बोरकर, धनराज नेवारे व पोशी / नरेश कोडापे यांनी केली.