कारंजा : स्थानिक विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा तथा जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळ कारंजाचे संस्थापक अध्यक्ष असलेले महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त गोंधळी लोककलावंत संजय कडोळे हे दरवर्षी श्रीक्षेत्र कारंजा ते श्रीक्षेत्र पंढरपूर - तुळजापूर आषाढी वारी करीत असतात तसेच ते दरवर्षी येरमळा डोंगरावर वृक्षारोपणाकरीता बिजारोपण सुद्धा करीत असतात. यावर्षी त्यांनी सामाजिक न्याय व विशेष विभागाच्या विविध योजनांची माहीती वारकऱ्यांना देण्याचे ठरवीले असून आपल्या वारीमध्ये त्यांनी भारतिय संविधानाचा जागर करण्याचे ठरवीले आहे. त्यासोबतच समता, न्याय आणि बंधुत्वाचा संदेश देत "श्रद्धा आणि अंधश्रध्दा" या विषयावर प्रवचन, अंधश्रध्दा, व्यसनमुक्ती, दिव्यांग जागृती इ . विषयावर दि .२८ जून ते २ जुलै पर्यंत पाच दिवस ते श्रीक्षेत्र पंढरपूर येथे राहून संविधानाचा जागर करणार असल्याची माहीती त्यांनी दिली आहे .