आरमोरी नगर परिषदेच्या वतीने शाळा महाविद्यालयांना कर भरण्यासाठी नुकतेच मागणी पत्र देण्यात आले. करामध्ये मालमत्ता कर सहित विविध कराचा समावेश करून भरमसाठ कराची आकारणी करण्यात आली आहे. शाळा महाविद्यालय हे विद्यादानाचे मंदिर असुन विद्यार्थ्यांना मोफत विद्यादानाचे काम करणारी सार्वजनिक संस्था आहे त्याकरिता शाळा महाविद्यालयांना १०० टक्के करमुक्त करण्यात यावे अशी मागणी आरमोरी येथील खाजगी अनुदानित शाळेच्या संथापकानी नगरपरिषदेच्या माध्यमातून शासनाकडे निवेदनातून केली आहे.
आरमोरी नगर परिषद क्षेत्रात येणाऱ्या शाळा महाविद्यालयाला विविध पद्धतीचे कर लाऊन भरमसाठ कराच्या मागणीचे पत्र नगरपरिषदेच्या वतीने नुकतेच देण्यात आले आहे.एवढेच नव्हे तर त्यानंतर नोटीस सुद्धा निर्गमित करण्यात आले .तालुक्यातील शाळा महाविद्यालयांना वेतनेत्त्त्तर अनुदाणाशिवाय दुसरे कोणतेही अनुदान मिळत नाही, वेतनेत्तर अनुदान हे वर्षभर लागणाऱ्या शालेय बाबीवर खर्च करण्यात येते.शाळा महाविद्यालयांच्या इमारत कर भरण्याकरिता कोणत्याही प्रकारचे अनुदान मिळत नाही.असे असताना शाळा महाविद्यालय यांच्याकडून कर रूपात नगरपरिषदेने विविध कराची आकारणी करूण भरमसाठ कराचा भरणा करण्याच्या मागणीचे पत्र देणे ही बाब शाळावर अन्याय करणारी आहे.
शाळा महाविद्यायांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून विद्यादानाचे मोफत काम करण्यात येते.या सर्व बाबींचा विचार करून शासनाने शाळा महाविद्यालयाला १०० टक्के करमुक्त करावे यासाठी सर्व संस्थापकांनी एकमुखाने निवेदनातून मागणी करण्यात आली.
याप्रसंगी मनोहर भाई शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मनोज वनमाळी,प्रेरणा शिक्षण संस्थेचे सचिव मदन मेश्राम, हितकारीनी शिक्षण संस्थेचे सचिव तेजरावजी बोरकर ,विद्यानिकेतन शिक्षण संस्थेचे सचिव योगेश कापकर श्री किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्था आरमोरी च्या वतीने प्रा.अमरदिप मेश्राम ,श्री.संताजी समाज सेवा प्रतिष्ठान च्या वतीने प्रा.दौलत धोटे,महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य साईनाथ अद्दलवार, हितकारीनी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय चे प्राचार्य जयदास फुलझेले,विवेकानंद विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्रीपाद वठे आदी उपस्थित होते.यासह आरमोरी नगर परिषदेचे कर्यालयीन प्रमुख प्रीतेश काटेखाये,कर निरीक्षक जीवन शिंदे आदी उपस्थित होते.