गोंडपिपरी : गोंडपीपरी आष्टी महामार्गावर महामंडळाच्या बस आणि ट्रक चा समोरासमोर भीषण अपघात झाला सदर घटना शनिवारी दि.२ सकाळी ९ वाजता ए.जी कंन्ट्रक्शन कंपनी च्या साईडवरच्या ऑफिस समोर घडली.
अहेरी कडून नागपूरला जाणारी बस क्रमांक एम.एच.४० ए क्यू.६३९५ व समोरून येणारा मालवाहू ट्रक क्रमांक एम.एच.३४ बी.झेड १२५२ या दोन वाहनाचा समोरासमोर अपघात झाला. सद्या स्थितीत नवेगाव ते आष्टी रोडचे बांधकाम सुरू असल्याने रस्ता दुभाजक न लावल्यामुळे सोबतच दिशा दर्शक फलक काम सुरू असणाऱ्या ठिकाणी नसल्याने हा अपघात झाल्याचे बोलल्या जात आहे.
सदर कामाच्या कंत्राटदारांच्या निष्काळजी पणामुळे हा अपघात झाला असून अशाप्रकारचे अनेक अपघात झाले आहे.मात्र संबंधित विभाग या कडे दुर्लक्ष करीत आहे . अपघातात दोन्ही वाहनांचे फारमोठे नुकसान झाले मात्र सुदैवाने जीवित हानी टाळली,बसचा चालक हा गोंडपीपरी तालुक्यातील करंजी येथील मानपल्लीवार असून ट्रकचा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे . पुढील तपास ठाणेदार राजगुरु करीत आहे.
नवेगाव ते आष्टी रोडचे बांधकाम ए. जी कंन्ट्रक्शन चे काम सुरू आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध मुरमाचा वापर केला आहे त्यामुळे मार्ग चिखलमय झाला आहे.कामाच्या ठिकाणी कुठेही सायडिंग बांधून नाही. सोबतच दिशा दर्शक फलक काम सुरू ठिकाणी नसल्याने हा अपघात झाला असावा.तीन तास वाहतूक बंद होती.अनेक अपघात त्या ठिकाणी घडत आहे.समंनधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे - सुरज माडुरवार शिवसेना तालुका प्रमुख गोंडपिपरी