ब्रम्हपुरी:-
खास कार्तिक गोपालकालानिमित्त तालुक्यातील जुगनाळा येथे विठ्ठल रुख्मिणी मोहल्ला यांच्या वतीने दादाजी तोंडरे यांच्या भव्य आवारात सैराट कन्हैय्या लावणी व डान्स ग्रुप वडसा प्रस्तूत सांस्कृतीक कार्यक्रमाचे (डान्स हंगामा) आयोजन करण्यात आले होते. या सांस्कृतिक *कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर यांच्या हस्ते पार पडले.*_
_या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून खेमराज तिडके अध्यक्ष ता.काँ.क.ब्रम्हपुरी तर सहअध्यक्ष म्हणून प्रभाकर सेलोकर सभापती कृ.उ.बा.स. ब्रम्हपुरी, उमेश धोटे सरपंच चौगान उपस्थित होते. सहउद्घाटक म्हणून डॉ. राजेश कांबळे माजी जि. प. सदस्य, विनोद चट्टे तलाठी साहेब वडसा, बंटीभाऊ गोंदोळे ग्रा.प. सदस्य गोगाव, उपाध्यक्ष म्हणून अंकुश मातेरे उपसरपंच चौगान उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून दिलीप पारधी रामपुरी, रविभाऊ जेल्लेवार मेंडकि तर प्रमुख अतिथी म्हणून गोपाल ठाकरे उपसरपंच जुगनाळा, चंद्रशेखर मेश्राम ग्रा.प. सदस्य जुगनाळा, पंढरी तोंडरे ग्रा.प. सदस्य जुगनाळा, अण्णाजी बगमारे माजी अध्यक्ष तं.मू.स. जुगनाळा, रेमाजी पाटील ठाकरे माजी अध्यक्ष तं.मू.स. जुगनाळा, प्रकाश बनपुरकर, घनश्याम राऊत, सुरेश चौधरी, विनायक मेश्राम, प्रेमानंद ठवळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते._
या कार्यक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी प्रमोदभाऊ चिमूरकर म्हणाले की, कार्तिक महिना हा धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे. या महिन्यात येणाऱ्या कार्तिक पौर्णिमाला विषेश महत्त्व असते. दरवर्षी कार्तिक माहच्या शुक्ल पक्षात कार्तिक पौर्णिमा साजरी केली जाते. असं म्हणतात की, या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात. अश्या या शुभ दिनाच्या मुहुर्तावर आपणही आपल्या मनात दुसऱ्यांप्रती असणारा राग, तिरस्कार, अहंकाराला तिलांजली देऊन आपले मन शुद्ध करावे. तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या या धार्मिक परंपरांचे माहात्म्य अबाधित राहील._
_विठ्ठल रुख्मिणी मोहल्ला यांच्या वतीने आयोजित या सांस्कृतिक कार्यक्रमाचा गावकऱ्यांनी आनंद घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नवतरुण शारदा मंडळ, जुगनाळाच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले._
आपल्या प्रतिक्रिया द्या....