अकोला: स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चा सदस्य, उत्कृष्ट तबलावादक व किर्तनकार रोहित सुर्यवंशी यांचे दि.२१ ऑक्टोबर २०२४ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.रोहित सुर्यवंशी हा अंध व कर्णबधिर असला तरीही त्यांनी आपल्या अपंगत्वावर मात करून दिव्यांग सोशल फाउंडेशन च्या माध्यमाने संपूर्ण विदर्भात नावलौकिक मिळवले होते.दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात दिव्यांग बांधवांच्या शिक्षण,रोजगार व आरोग्यासाठी विविध सामाजिक उपक्रमात रोहित सुर्यवंशी यांनी आपले महत्वपूर्ण योगदान दिले आहे.दृष्टी गणेशा या संस्थेच्या रक्तदान नेत्रदान व अवयवदानाच्या कार्यक्रमात तबला व शंख वादक म्हणून रोहित सुर्यवंशी यांनी जनसामान्यांचे रंजन केले आहे.दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या एक हात सहकार्याचा या सामाजिक दिवाळी उपक्रमात आपले भरीव योगदान दिले आहे.अपेक्षा अपार्टमेंट २ गणेश नगर येथे संस्थेच्या कार्यालयात सदस्यांनी रोहित सूर्यवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या मागे आई रश्मी सूर्यवंशी व भाऊ श्रवण सूर्यवंशी हे परिवारात आहेत . रोहित सूर्यवंशी यांच्या अचानक जाण्याने दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला , एकविरा फाउंडेशन अकोला व संगीत क्षेत्रातील विविध मान्यवरांनी आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली आहे .