झोप मोडली तरी चालेल, पण आईवडीलांचे स्वप्न नाही मोडली पाहिजेत.
यह मातृ-पितृ-भू, हमे प्यारी है जान से ।
प्यारी है जान से, रहे बढके जहाँन से ।।
उदाः-- खूप पुरातन कहाणी आहे. एक दिवस तोडलमल आईला म्हणाला की, आई ! तु नेहमी नेहमी म्हणत असतेस...आईचं कर्ज कधी उतारणार. बोल आई ! सांग तुझं कर्ज किती आहेस? मी तुझ्या साऱ्या कर्जातून मुक्त होतो. सांग आई ! तुला हिरे देऊ, पैसा देऊ, सोनं देऊ की चांदी देऊ...सांग?
आई म्हणाली, तुझ्या सोनं, चांदीने कर्ज उतरु शकत नाही. आई तोडलमलला म्हणाली की, तू आज रात्री माझ्याजवळ झोप. आईचं कर्ज फेडायचं असल्यामुळे तो आईच्या खोलीत झोपायला गेला.
तो आईच्या शेजारी दुसऱ्या बिछाण्यावर झोपला. त्या झोपेची डुलकी यायला सुरुवात झाली. त्यावेळेस आईने त्याला हलविले आणि एक ग्लास पाणी मागितले. तो मोठ्या श्रद्धेने आईला एक ग्लास पाणी आणून दिले. आईने ते पाणी पिऊन उरलेले पाणी तोडलमलच्या बिछाण्यावर सांडविलेस. बिछाना ओला झाला नां आई? आई म्हणाली, बाळा ग्लास हातचा पडला.
तो परत झोपायला गेला. त्याला झोप यायला सुरुवात झाली. तेवढयात आईने त्याला हलविले आणि प्यायला पाणी मागितले. तो परत उठला आणि पाणी घेऊन तणक्याने गेला. आईस म्हणाला, घे पाणी. आईने ते पाणी पिले व उरलेले पाणी त्याचे बिछाण्यावर सांडविले. त्याला आईचा फारच राग आला. हे काय? माझा बिछाना ओला झालास. मी कसं झोपायचं? आई म्हणाली, अरे मी म्हातारी आहे, सांडलं थोडं पाणी.
अरे, जा झोप ! एका रात्रीची तर गोष्ट आहे. जा झोप तुझ्या बिछाण्यावर. बिछाना ओला झाल्यामुळे त्याला थंडी लागून कुडकुडायला लागलं. कशीतरी त्याला गाढ झोप लागली. परत आई त्याला हलवून म्हणाली? एक ग्लास पाणी देतोस का रे ! त्याची आईविषयीची श्रद्धा कमी झाली. आई ! तु आत्ताच तर पाणी पिलीस. तो तणक्यानेच उठला व एक ग्लास पाणी आईसं दिले. आईच्या हातला ग्लास त्याचे बिछाण्यावर पडला व पाणी सांडले. आता तर बिछाना ओलाचिंब झाला.
तो आईला म्हणाला, तू पागल झाली कां? दिमाग खराब झाला काय? तो आईस खूप खूप बोलला. आई म्हणाली, बेटा जा झोप. परत आईने स्वतः पाणी घेतले. आईचा ग्लास पुन्हा त्याचे बिछाण्यावर पडला. त्याला जाग आली. तो आईला म्हणाला, तू कायखाऊन आली होतेस? तू म्हणत होतीस, माझं कर्ज फेडायचं आहे. माझ्या खोलीत झोप. एका रात्रीत कर्ज फिटणारं. तो आईला म्हणाला, "चुलीत गेलं तुझं कर्ज" तू मूर्ख, पागल झाली आहे. त्याचबरोबर आईने त्याचे कान पकडून जोराने त्याच्या थोबाडात थापड मारली.
आई तोडलमलला म्हणाली की, तू लहान असताना माझे बिछाण्यावर गंदगी करत होतास. मी स्वतः ओल्यावर झोपून तुला कोरड्या जागेवर झोपवित होती. पुन्हा पुन्हा परत तू बिछाना ओला करत होतास. तुला दुध, पाणी पाजत होती. तू एक रात्र माझे शेजारी झोपू शकला नाहीस. तू या जन्मात आईचं कर्ज फेडून कधीच मुक्त होऊ शकत नाही. तू एवढा माझा राग केलास. मी जर तुला ओल्या बिछाण्यावरुन फेकून दिले नाहीस, आणि तू म्हणतोस की, आईबापाने आमच्यासाठी काय केलेस? तू जेव्हा आईबाप बनल्यावरच कळेल. अन्यथा नाही.
बोध:- आईने आम्हाला जन्माला घातले. पालनपोषण केले आहे. आईपेक्षा या दुनियेत मोठं कुणीही नाही. मंदिरात जाण्यापेक्षा आईच्या शरिरातल्या मंदिरात आपण प्रथम प्रवेश केला. आईचे दर्शन करा. आशिर्वाद घ्या. आईशिवाय जगात मोठं कुणी नाही. आईचं मोठं विद्यालय आहे, म्हणजे विश्वविद्यालय आहे.
आईचे संस्कार गर्भापासून जीवावर होऊ शकतात, म्हणूनच गुरुपेक्षा आईचं सर्वश्रेष्ठ गुरु होऊ शकते. राष्ट्रसंत म्हणतात.
नारी नही अबला है ये,
इसे क्यो किया बदनाम है ।
मौका नही तूने दिया, देखा न उसका काम है ।
आदर्श देवी मानकर,
तू शक्ती उसको माँगता ।
यह भी समय आताषकी,
अबला को सबला जब जानता ।।
गुरुवर्य ऋषी घुसरकर महाराज म्हणतात.
मातेच्या गर्भात वाढला ।
जठराअग्नीच्या तापे पोळला ।।
देवा सोडव सोडव येथूनी ।
मारशी हाका रे ।।
विसरला का जन्मा येऊनी ।
प्रभुच्या स्वरुपारे ।।
आपल्यावर आईबापाचे एवढे उपकार आहे, ते आपणांस कळत नाही. तुम्ही आईबापाला ठेवून वृद्धाश्रमात तुम्ही पत्नीसह बंगल्यात राहता. तुमच्याकडे कितीही धन, दौलत असले तरी तुम्ही नक्कीच पापाचे धनी आहात. हे जग आईबापानेच दाखविलेस. ते आपण विसरुन चालणार नाही.
लेखक:-
पुरुषोत्तम बैसकार मोझरकर
श्रीगुरुदेव प्रचारक, यवतमाळ
आपल्या प्रतिक्रिया द्या....