अकोला:-निःस्वार्थ सहकार नेते व सोपीनाथ महाराज संस्थान चे अध्यक्ष गुलाबराव नारायणराव पाटील यांचे दुःखद निधन झाल्याची बातमी कळली. सहकार क्षेत्रात निस्वार्थपणे कार्य करून पातूर तालुक्यातील सहकार क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करून अनेक संस्थांना नावारूपास आणणारे गु ना पाटील यांची प्राणज्योत संध्याकाळी आठ वाजता मालवली आहे. त्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पद अनेक वर्ष भूषवले आहे. पातूर तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संस्था, पातूर तालुका जिनिंग सहकारी संस्था, तालुका देखरेख संघ, जिल्हा सहकारी बोर्ड, सहकारी मुद्रणालय, निळकंठ सहकारी सूतगिरणी, सेवा सहकारी सोसायटी दिग्रस बुजरुक चे अध्यक्ष अशा अनेक संस्थांचे पदे त्यांनी भूषउन सहकार क्षेत्राला मोठी उभारी दिली होती. सहकार क्षेत्रात निस्वार्थपणे, निष्कलंक सेवा देणारे जिल्ह्यातील एकमेव नेते म्हणून त्यांचे नाव लौकिक होते. त्यांच्या मागे प्रदीप, संदीप, विजय पाटील तीन सुपुत्र व मोठा गोतावळा आहे. त्यांच्या जाण्यामुळे सहकार क्षेत्राची मोठी हाणी झाली आहे. त्यांची अंतीम यात्रा त्यांचे रहाते घर दिग्रस बुजरुक येथून 11 वाजता निघून सोपीनाथ महाराज संस्थान येथे होईल.अशा या महान सहकार नेत्यास भावपुर्ण श्रद्धांजली.
कृष्णा अंधारे माजी अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला जिल्हा ग्रामीण.
अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ अमरावती विभाग. अध्यक्ष श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय शिर्ला अंधारे तालुका पातूर जिल्हा अकोला.