वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : जिल्ह्यात 2 जून रोजी शिवराज्यभिषेक दिन सोहळा (तिथीप्रमाणे), 3 जून रोजी वटपौर्णिमा उत्सव आणि 5 जून रोजी गुरु हरगोविंद सिंह जयंती उत्सव जिल्ह्यात सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत विविध पक्ष/ संघटना/सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून वेगवेगळ्या मागण्याकरिता धरणे/आंदोलने/ उपोषणे करण्यात येत आहे. जिल्हा सण, उत्सवाच्या दृष्टीने तसेच राजकीय दृष्टीने संवेदनशील आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखणे सोयीचे व्हावे, यासाठी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) अन्वये 14 जूनपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जिल्हा दंडाधिकारी श्री.षण्मुगराजन एस. यांनी लागू केले आहे.