कारंजा (लाड) : कारंजा (लाड) येथील कडोळे परिवारातील गोंधळी लोककलाकार असलेल्या प्रामाणिक, मनमिळाऊ,शांत,संयमी, सुस्वभावी स्व.उमेश मधुकरराव कडोळे यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले असून,ते धार्मिक व आध्यात्मिक विचारसरणीचे असून आदिशक्ती श्री. कामाक्षादेवीचे गोंधळी आणि संत गजानन महाराजांचे परमभक्त सुद्धा होते.त्यामुळे त्यांच्या कुटूंबीयांतर्फे तेरवी सारख्या अनिष्ट प्रथेला आळा देवून,तेवढ्या खर्चाच्या रकमेचा सेवाव्रती कार्यासाठी सदुपयोग व्हावा.या उद्देशाने खारीचा वाटा म्हणून काही रक्कम सेवाव्रती मानवसेवी कार्यासाठी खर्ची करण्याचा निर्णय त्यांच्या मोठ्या भावाने,दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी घेतला असून,ते संत गजानन महाराज मंदिर प्रगटदिन पालखी परिक्रमेचे चोपदार आहेत,त्यांनी आपल्या बेताच्या आर्थिक परिस्थिती मधून अल्पशी निवडक रक्कम 'फुल नाही तर फुलाची पाकळी' म्हणून संत गजानन महाराज मंदिर,शहर पोलीस स्टेशन मंदिरात गुरुवार रोजी सायंकाळी महाआरती नंतर होणाऱ्या प्रसादासाठी खर्ची करण्याचे ठरवून,त्याप्रमाणे गुरुवार दि.१७ जुलै २०२५ रोजी स्व.उमेश कडोळे स्मृती प्रित्यर्थ,संत गजानन महाराजांचा प्रसाद होणार असल्याचे कळविण्यात आले आहे.तसेच संत नामदेव महाराज मंदिरात देखील अन्नधान्यासाठी धान्याची अल्पशी मदत दिली आहे.जय गजानन ! गण गणात बोते !!!