कारंजा (लाड) : कारंजा शहरातील काँग्रेस निष्ठावंत, सामाजिक व राजकिय नेते, माजी नगराध्यक्ष अरविंद लाठीया यांच्या, सर्व जातीधर्माच्या विविध पक्षातील मित्रमंडळींनी एकत्र येवून, गुरुवारी दि. १० एप्रिल २०२५ रोजी,स्थानिक गायत्री माता मंदिर,महेश भवन समोर,इन्नानी जीन कारंजा येथे त्यांचा वाढदिवस साजरा केला.या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरविंदजी लाठीया यांच्या अभिष्ट चिंतनासाठी प्रामुख्याने माणिकचंदजी देवडा,श्याम सेठ अग्रवाल,सतिश शाह,अमृत सेठ थद्दानी,प्रफुलभाई शहा,घनशाम पालीवाल,मदनचंद देवडा,विजयभाऊ बगडे, घनशाम पालीवाल,रवीन्द्र शहाकार,डॉ.राजेंद्रजी संपट, पारसचंद गोलेच्छा,देवीलालजी व्यास,प्रकाशसेठ शहा, भिकमसेठ गुगलीया,नंदुसेठ सुराणा,अनिलसेठ अग्रवाल, सुर्यकांत जिरापूरे,नितीन उर्फ पप्पूसेठ भट,पवार सर,प्रदिप वानखडे,अब्दुल राजीक शेख, संजय कडोळे,नंदकिशोर कव्हळकर,डॉ. इम्तियाज लुलानिया,डॉ.ज्ञानेश्वर गरड,सुनिल गुंठेवार, भगवान खेमवानी,जुम्माभाई पप्पूवाले,भगवानदास खेमवानी,उमेश अनासाने,काजे पाटील,उदयसिह जी ठाकुर सर, विजय खंडार, रोमिलसेठ लाठीया,अत्ताउल्लाह खान,तौसिफखान,आरिफभाई ठेकेदार,जुबेर भाई ठेकेदार, रिजवानभाई,वसीमभाई,सय्यद जावेद,सलिमखान,समिरभाई आदींसह शेकडो चाहत्यांची तोब्बा गर्दी जमली होती.

यावेळी माजी नगराध्यक्ष अरविंद लाठीया यांच्या अनेक चाहत्यांनी शाल,श्रीफळ,हार,बुके,पेढे देवून त्यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन करीत त्यांना दिर्घायु होण्याच्या शुभेच्छासह कारंजा नगरीच्या सर्वांगीन विकासाकरीता पुढील वाटचालीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्यात.याप्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विदर्भ उपाध्यक्ष संजय कडोळे तथा सदस्य प्रदिप वानखडे यांनी पुढील राजकिय प्रवासाबाबत विचारले असता त्यांनी सांगीतले की, "माझ्या कार्यकाळात मी कारंजेकर नागरीकांच्या हिताकरीता प्रयत्न केले.
त्यासाठी तत्कालिन माझे सहकारी नगरसेवक आणि नगर परिषद अधिकारी कर्मचारी यांचा समन्वय ठेवून,कारंजेकरांच्या सर्वांगीन विकासावर भर दिला होता.व त्यामुळे स्थानिक जनतेला आजही माझ्या कारकिर्दीची आठवण येते.हिच माझ्या सामाजिक कार्याची पावती होय." भविष्यातही मी माझ्या चाहत्यांच्या प्रेमापोटी राजकारणात सक्रिय राहून कारंजेकरांच्या सर्वांगीन विकासाठी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका स्वबळावर लढविण्याचे सुतोवाच सुद्धा त्यांनी केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....