स्थानिक जिल्हा परिषद नगर खडकी अकोला येथील समाजसेवक तथा संयोजक निर्भय बनो जणआंदोलन, मराठायोद्धा गजानन ओंकारराव हरणे यांना सन 2024 चा समाजकारण संघर्ष पुरस्कारासाने महात्मा ज्योतिबा फुले तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवा निमित्त संघर्ष बहुउद्देशीय संस्था तथा युगप्रवर्तक मल्टीपर्पज फाउंडेशन च्या वतीने सन्मानित गौरवण्यात आले. . हा संघर्ष पुरस्कार 7/एप्रिल 2024 ला संध्याकाळी सात वाजता बोरगाव मंजू येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दिल्या गेला . गजानन ओंकार हरणे यांना हा समाजकारण संघर्ष पुरस्कार प्राप्त झाला असून पुरस्कारा सनमानचिन्ह, गौरवपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले .गजानन हरणे हे गेल्या 35 वर्षापासून अकोला जिल्ह्यात विविध सामाजिक संस्था संघटनेच्या माध्यमातून गोरगरीब, दिन दलित, दिव्यांग, वंचित लोकांसाठी समर्पण भावनेने त्याग वृत्तीने निस्वार्थपणे काम करीत आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, श्याम मानव, मेघा पाटकर आदी सह शाहू ,फुले ,आंबेडकर ,गाडगे महाराज, तुकडोजी महाराज यांचे विचार घेऊन सेवाभावी वृत्तीने काम करीत आहेत. आजपर्यंत माहितीचा अधिकार, लोकपाल विधेयक व जनहिताचे विविध 11 कायदे व्हावे म्हणून सोळा वेळा आमरण उपोषण केलेले आहेत.तसेच मराठा आरक्षण मिळावे म्हणून सतत 8 दिवस अन्नत्याग आंदोलन करून मराठा समाजासाठी त्यांनी खूप मोठे कार्य केले आहे. स्थानिक प्रश्न समस्या व भ्रष्टाचाराच्या विरोधात सुद्धा अनेक उपोषणे आंदोलने केलेली आहेत.तसेच अण्णा हजारे यांच्यासोबत अनेक भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन मध्ये 14 दिवस आमरन उपोषण जन लोकपाल कायद्यासाठी लढा दिलाआहे.त्यांच्या या समर्पित त्याग भावनेने काम करण्याच्या समाज कार्याची दखल घेऊन आज पर्यंत शंभरच्या वर पुरस्कार भारत सरकार, राज्य शासन ,विविध सामाजिक संस्था संघटनेच्या वतीने त्यांना गौरवण्यात आले आहे. नुकताच दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमी यांच्यावतीने 39 व्या राष्ट्रीय दलित साहित्यकार सामाजिक संमेलनात दिल्ली येथे गजानन हरणे यांना सन्मानाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल अवार्ड देऊन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत व शुभ हस्ते गौरवण्यात, सन्मानित करण्यात आले. तसेच यावर्षीचा मराठाभूषण पुरस्काराने सुद्धा ते सन्मानित झाले आहेत. व अकोला भूषण पुरस्कार हा प्रतिष्ठेचा मानाचा सन्मान यावर्षी त्यांना मिळाला आहे. तसेच यावर्षी 2024 चा समाजकारण संघर्ष पुरस्कार समाजसेवक गजानन हरणे यांना या वर्षात पाच पुरस्कार मिळाले असून हे पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध सामाजिक संस्था, संघटनेचा वतीने आनंद व्यक्त केला जात असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शिवसेना नेते माजी आमदार हरिदासजी भदे यांच्या अध्यक्षतेखाली व कार्यक्रमाचे उद्घाटक अनिताताई खेडकर सरपंच बोरगाव मंजू, , संजय वानखडे जिल्हाध्यक्ष सुशिक्षित बेरोजगार फेडरेशन अकोला, अशोक तायडे पाटील चित्रपट निर्माता डायरेक्टर खेड्यातलं येड प्रेम , आकाश डोंगरे अध्यक्ष युग प्रवर्तक मल्टीपर्पस फाउंडेशन, भरत बोरे प.स. सदस्य , संजय देशमुख अध्यक्ष छत्रपती संभाजी महाराज स्मारक समिती,ज्ञानेश्वर वानखडे स्वागतअध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य, रमेश समुद्र मुख्य संपादक साप्ताहिक तपोभूमी, सामाजिक कार्यकर्ते सखारामजी वानखडे,समाधान वानखडे , योगेश विजयकर, बाळ काढणे सर्पमित्र आदी मान्यवरांच्या उपस्थितीत व शुभ हस्ते यावर्षीच्या प्रतिष्ठेचा समाजकारण संघर्ष पुरस्कार सनमान पूर्वक प्रदान करण्यात आला आहे . या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाला जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ समाजसेवक ,सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्था संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.