राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ महाराष्ट्र राज्य च्या वतीने ओबीसी रत्न म्हणून क्रांती सुर्य महात्मा ज्योतीबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे ते जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, गोंडसावरी पंचायत समिती चंद्रपूर येथे कार्यरत आहे ते शिस्तप्रिय, विद्यार्थी प्रिय,शिक्षकप्रिय, उच्च विभूषित असून शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी केलेली आहे. माळी समाजात त्यांचे भरीव योगदान आहे.
राष्ट्रीय ओबीसी महासंघा च्या चळवळीत अनेक वर्षापासून काम करीत आहेत.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर झालेला आहे .त्याबद्दल चंद्रपूर जिल्ह्यात शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.
पुरस्कार वितरण सोहळा मा.Dr.श्री.संजय कुंटे मंत्री महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते दिनांक 19 नोव्हेंबर रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव या पवित्र ठिकाणी घेण्यात येत आहे असे राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष देवराव दिवसे यांनी कळविले आहे.