कारंजा (लाड) : संपूर्ण आयुष्यभर भागवत धर्माची पताका घेऊन,वारकरी सम्प्रदायाचा अथक प्रचार प्रसार करणाऱ्या हभप.राजारामजी काटे यांच्या वाढदिवसानिमित्त, संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेच्या सांस्कृतिक विभागाचे तालुका प्रमुख तया जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळ आणि विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कारंजा शहर पोलीस स्टेशन परिसरातील संत गजानन महाराज मंदिर कारंजा येथे श्रींचे पूजन करून,श्रीचरणी हभप.राजारामजी काटे यांच्या दिर्घायुष्याची प्रार्थना करीत त्यांचे अभिस्ट चिंतन केले.यावेळी उपस्थितां समोर बोलतांना संजय कडोळे यांनी सांगितले की, बुलडाणा जिल्हातील मोताळा येथील हभप.राजारामजी भिलाजी काटे हे श्रीक्षेत्र पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीचे निस्सिम भक्त होते.निरोगी असेपर्यंत त्यांनी श्रीक्षेत्र पंढरपूरची पायदळ वारी केली. भागवतधर्म आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार केला. परंतु पुढे अर्धांगवायूने त्यांना ग्रासले.त्यांची अखंड वारी बंद पडली.मात्र तरीही त्यांच्या मुखात सदैव पांडूरंगाचे नाम असते.शासनाने वारकरी धर्मासाठी काहीतरी केलं पाहिजे. राज्यात एखादं वारकरी विद्यापिठ उभ रहावं.शासन दरबारी वारकऱ्यांना सन्मान मिळावा.वारकरी भजनी मंडळींना मानधन मिळावे.असं त्यांना नेहमी वाटायचं व कित्येकदा शासन दरबारी त्यांनी मागणीही केली होती.असे सांगीतले. संजय कडोळे यांनी पुढे सांगीतले की, हभप. राजारामजी काटे यांच्या व समस्त वारकरी संप्रदायाचे मागणी नुसार अखेरीस मागील वर्षी महायुती शासनाच्या तत्कालिन मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे यांनी वारकऱ्यांना राज सन्मान देऊन मानधन देण्याचे जाहिर केले. तसेच यावर्षी देखील विद्यमान मुखमंत्री श्री. देवेन्द्रजी फडणविस यांनी राज्यातील सर्व भजनीमंडळांना मुख्य प्रवाहात आणून प्रत्येकी २५,००० रु.अनुदान देण्याचे जाहीर केले. त्यामुळे ही वार्ता ऐकून हभप. राजारामजी काटे यांनी समाधान वक्त करून माझी इच्छा पूर्ण झाल्याने मी धन्य झालो असून राज्यशासनाने वारकरी संप्रदायाला आज राजाश्रय दिला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे त्यांचे चिरंजीव गजाननराव काटे यांनी सांगितले आहे.हभप. राजारामजी काटे यांचे पुढील आयुष्य आनंद,सुख,समाधान निरोगी जावो ही श्रीचरणी प्रार्थना करून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा . . !