शंकरपूर पासून पाच किमी अंतरावरील आंबोली येथे 16 जून च्या सायंकाळी साडेसात वाजता जुन्या वादातून लाठीने वार करून जागीच मारले तर मुलगा धावून आला असता मुलालाही मारहाण केली परंतु मुलाने बचाव करून पळ काढला. त्यामुळे मुलगा थोडक्यात बचावला त्यामुळे आंबोली येथे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृतक शारदा दयाराम वाघ वय 45 ही आपल्या घराच्या पांजीमध्ये बसलेली होती तर मुलगा मोहन दयाराम वाघ वय 23 वर्ष हा घराच्या समोर पाजी उभी करण्यासाठी सबलेने खड्डे करत होता तेवढ्यात आरोपी गोपीचंद संपत शिवरकर वय 32 वर्ष हा अचानक हातात लाठी घेऊन येऊन शारदा च्या डोक्यावर लाठीने जोरदार प्रहार केला हे पाहून मुलगा मोहन धावून आला परंतु त्याच्यावरही आरोपीने वार करून त्याला जखमी केले. परंतु मुलगा जखमी अवस्थेत त्याच्या तावडीतून पळून गेला त्यामुळे केले परंतु मुलगा जखमी अवस्थेत त्याच्या तावडीतून पळून गेला त्यामुळे त्याचा जीव वाचला परंतु डोक्यावर बसलेल्या जोरदार वारामुळे शारदाचा काही वेळातच जीव गेला.
आरोपी हा गुंड प्रवृत्तीचा असून त्याने आंबोली येथील बेघर वस्तीमध्ये आपली दहशत निर्माण केली असल्याचे समजते आरोपी हा याआधी महिलेसोबत झगडा करणे मारामारी करणे असले प्रकार करीत असल्याचे नागरिक सांगतात त्यामुळे ही महिला काही दिवसापूर्वी आरोपीच्या दहशतीमुळे मुलाला घेऊन शेजाऱ्याच्या घरी झोपायला जायची त्यामुळे शारदा व तिचा मुलगा आरोपीच्या दहशतीखाली जीवन जगत होते.अखेर आरोपीने संधी साधून तिचा खून केला परंतु मुलगा मोहन त्याच्या तावडीतून निसटून पळून गेल्यामुळे वाचला या घटनेमुळे आंबोली तसेच परिसरात शारदा व तिच्या मुलाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती आंबोलीचे पोलीस पाटील थाटकर यांनी पोलिसांना कळवल्यानंतर लगेच घटनास्थळी पोलिसांनी हजर होऊन आरोपीला अटक केली व आरोपीवर अॅट्रॉसिटी अॅक्ट, व भादवि कलम 302, 324, 447 नुसार गुन्हा दाखल केला आहे घटनेचा पुढील तपास चिमूर चे उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन भिशी चे ठाणेदार प्रकाश राऊत व सहकारी करीत आहेत.