सिंदखेड राजा लक्झरी बस जळीतकांडातील बळींना प्रत्येकी 5 लाख रु.तर सप्तशृंगी गडावरील अपघातातील मृतकाला एस टी महामंडळाकडून 10 लाख रुपये असा भेदभाव का.?
वाशिम : जीवीत व्यक्तीची किमंत होऊ शकते काय ? लहानपणी बालभारतीच्या पुस्तकात आम्हाला एक धडा होता. त्या धड्यामध्ये एक भिकारी भिक्षा मागीत असतांना एका सावकाराच्या घरासमोरून,भिक्षा मागतांना परमेश्वराला आपल्या गरीब परिस्थिती विषयी दोष देत असतो.ते बघून सावकार भिक्षुकाला बोलावतो.आणि त्याला म्हणतो. "अरे बाबा तुला चांगले हात पाय सदृढ असे शरीर आहे.तेव्हा तू काहीतरी कामधंदा करावास तर,तू तुझ्या गरीब परिस्थिती बद्दल परमेश्वराला दोष देतो.तू असे कर तुझा एक डोळा मला विकत दे.आणि मोबदल्यात माझेकडून एक लाख रुपये किंमत घे." हे वाक्य ऐकताच त्या भिकार्याचे डोळे खाडकन् उघडतात.आणि तो विचार करू लागतो. "जर माझ्या एका डोळ्याची किंमत एक लाख रुपये.तर दोन डोळ्याची दोन लाख.मग हाताची . . . पायाची किमंत . . . म्हणजेच माझ्या संपूर्ण शरीराची किंमत करोडो रुपये आहे." त्याचेमध्ये सुधारणा होऊन तो काम धंद्याला लागतो.ही गोष्ट येथे सांगण्याचा उद्देश म्हणजे शासनाने अर्थसहाय्य करतांना प्रचंड भेदभाव केला आहे.कोरोना आजार ग्रस्ताला केवळ 50,000/- रुपये तर नुकत्याच सिंदखेड राजा येथील लक्झरी बस जळून कोळसा झालेल्या भयानक अपघातातील मृतकाच्या कुटूंबाना प्रत्येकी फक्त पाच लाख रुपये आणि आज सप्तश्रुंगी गडावरील दरीमध्ये बस कोसळून झालेल्या अपघातातील मृतकांना दहा लाख रुपये.एका जिवीताची किंमत एवढी कमी कशी काय असू शकते ? लक्झरी बस अपघातात शिक्षणाकरीता - नोकरी करीता पुण्याला जाणारे,तरुण तरुणी विद्यार्थी जिवीतास मुकले.कदाचित त्यामधील काही मृतक तळागाळातील गरीब असू शकतात.तर अनेक मृतक करोडपती सुध्दा असू शकतात. अनेक व्यक्ती दररोज लाखो रुपयाचा व्यवहार करणारी सुद्धा असू शकतात.शिवाय अनेक घरातील कर्ते कुटूंबाचा आधारस्तंभ असू शकतात. त्यांच्या अकाली मृत्युने आज अनेक कुटूंब पूर्णतः निराधार व बेसहारा झालेली असू शकतात. तेव्हा शासनाने सर्वोतोपरी विचार करायला हवा.त्यावर मला म्हणायचे आहे की,शासनाने त्यांच्या जिवीताची किंमत कशी काय ठरविली ? हाच माझा प्रश्न आहे.खरे तर शासनाने नोकरी आणि शिक्षणाकरीता,लक्झरीने, हिंदुह्दयसम्राट कै.बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या ह्या मृतक प्रवाशांच्या कुटूंबातील किमान एका व्यक्तिला तरी शासकिय नोकरीत सामावून घ्यायला हवे.अशी मागणी,महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.