मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा. अजित दादा पवार, महीला बाल कल्याण मंत्री मा. अदिती तटकरे महाराष्ट्र सरकारची मानधन वेतन वाढ, दरमहा पेंशन, उपदान, देण्याची नुसतीच घोषणा, अंमलबजावणी नाही; कॉ. नयन गायकवाड
अकोला. दि २३.०९.२०२४
कॉ. नयन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली अकोल्यातील अंगणवाडी कर्मचारी कॉ. दुर्गा देशमुख, कॉ. सुनंदा पद्मने, रेखा महले, मीरा दही, जया मार्के, मालू अवताडे, कॉ. प्रिया वरोटे प्रिया गजभिये, ललिता गवई, जया शिरसाठ, संजय गवई व महराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचारी पुन्हा आझाद मैदानावर मानधन वेतन वाढ, दरमहा पेंशन, उपदानची अंमलबजावणी रखडल्याने अंगणवाडी कर्मचारी उद्यापासून बेमुदत उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं आहे. २५ सप्टेंबर रोजी जेल भरो आंदोलन करण्यात येणार आहे. उद्या सकाळी १० वाजता आझाद मैदानावर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक) व समितीमधील ७ घटक संघटनांचे कॉ. दिलीप उटाने, कॉ. नयन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील कर्मचारी बेमुदत उपोषणात सहभागी होणार असल्याची माहिती आहे.
नेत्यांना पाठिंबा देण्यासाठी रोज हजारो अंगणवाडी कर्मचारी २४ तासांच्या साखळी उपोषणाला बसणार आहेत. २५ सप्टेंबरला अकोल्यातील व राज्यातील अंगणवाड्या बंद ठेवून हजारो अंगणवाडी कर्मचारी आझाद मैदान येथे कर्मचारी जेल भरो आंदोलनात सहभागी होणार आहेत. जर शासनाने जीआर काढला नाही तर लाखो अंगणवाडी कर्मचारी मुंबईत स्थळ ठोकून राहतील. राज्यभरातील अंगणवाडी मानधन वेतन वाढ, दरमहा पेंशन, उपदानचा देण्याचा निर्णय महिला व बालकल्याण विकास विभागाने घेतला होता. या निर्णयाला वित्तविभागाने वेतनवाढीच्या प्रस्तावाला मान्यताही दिली होती. मात्र, त्याची अद्याप अंमलबजावणी न झाल्याने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक) व महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती उपोषणाला बसणार आहेत.