रिसोड शहरातील कालुशा बाबा दर्गा जवळील पांडे लेआट मधील नाल्याचे व रस्त्याचे बांधकाम करुन देण्याची मागणी या परीसरात राहणार्या नागरीकांनी केली आहे.
या परीसरातील नागरीकांनी गेल्या २ ते ३ वर्षापासुन नगर परीषदेला या बाबत निवेदन देऊन मागणी केली असतांनी सुद्धा अद्याप पर्यंत या ले-आऊट मधील रस्ते व नाल्याचे बांधकाम न झाल्यामुळे या परीसरात राहणार्या नागरीकांनी रोष व्यक्त केला आहे. या संदर्भात सविस्त वृत्त असे की गेल्या ३५ ते ४० वर्षापासून पांडे ले-आऊट मध्ये अनेक नागरीकांनी आपली घरे बाधली आहेत परंतु घराच्या मागील बाजुस पाण्याचा निचरा होण्यासाठी नाली नसल्यामुळे या परीसरात संपुर्ण घाणीचे साम्राज्य परसले आहे. न.प. कडुन या संदर्भात कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही. या परीसरात राहणार्या काही नागरीकांनी आमच्या प्रतीनीधीशी बोलतांना सांगीतले की या ले-आऊट मधील रस्त्यासाठी व नाल्यासाठी ७५ लाखाचा नीधी विधानसभा निवडणूकीपुर्वी माजी खासदार अनंतरावजी देशमुख व युवा नेते अॅड. नकुलदादा देशमुख यांनी शासनाकडुन मंजुर करुन आणला हा निधी न.प. प्रशासनाला प्राप्त झाला आहे. सदर निधी प्राप्त होऊन सुद्धा न.प. प्रशासनाची नाली व रस्त्याचे बांधकाम करण्याबाबत का उदासीनता दिसून येते असा प्रश्न या परीसरात राहणार्या नागरीकांना पडला आहे. न.प. प्रशासनाने या बाबत दखल घेऊन पांडे ले-आऊट मधील नाल्याचे व रस्त्याचे बांधकाम त्वरीत करुन द्यावे. अशी मागणी या परीसरात राहणारे नागरीक सारंगआण्णा जिरवणकर, संदिपआण्णा जिरवणकर, रामेश्वर बानोरे, अक्षय आण्णा जिरवणकर, श्रीहरी बानोरे, रंगराव सानप, संजय गुजरे, सचिन तायडे, अविनाश कायंदे, संजय बगडीया, मदन सेठ बगडीया, रुहटीया यांच्यासह अनेक नागरीकांनी केली आहे.