रेल्वे प्रशासनाच्या दक्षिण पूर्व नागपूर विभागामार्फत विविध सुरक्षा संबंधित देखभालीची कामे आणि गाड्यांची वक्तशीरपणा राखण्याशी कामे केली जात आहेत.या कामांदरम्यान केवळ जिल्ह्यातून चंद्रपूर, बालाघाट, डोंगरगड मार्गावर धावणार्या मेमू गाड्या रेल्वे 9 ऑगस्टपासून रद्द करण्यात आल्या आहेत.
यात गाडी क्र. 08714 इतवारी-बालाघाट मेमू, गाडी क्र.08715 बालाघाट-इतवारी मेमू, गाडी क्र. 08806 या गाड्या 9 ऑगस्ट ते 23 ऑगस्टपर्यंत तसेच गोंदिया-वडसा मेमू, गाडी क्र. 08808 वडसा-चांदाफोर्ट मेमू व गाडी क्र. 08805 चांदाफोर्ट-गोंदिया मेमू चांदाफोर्ट, गाडी क्र. 08723 डोंगरगड-गोंदिया मेमू डोंगरगड या गाड्या 10 ऑगस्ट ते 23 ऑगस्टपर्यंत पुढील 14 दिवस रद्द करण्यात आल्या आहेत.