सुरजागड लोह खनिज प्रकल्पात स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देऊन नोकरीत प्राधान्य देण्यात यावेअशी मागणी समता युवा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष निलेश अंबादे यांचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे मागणी केली.
गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव असलेला एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथे लोह खनिजाचे मोठ्या प्रमाणात साठे आहे. सुरजागड येथील कच्चा लोहखनिज उत्खनन जिल्ह्याबाहेर नेला जात आहे. जर गडचिरोली जिल्ह्यात लोह खनिजावर आधारित प्रक्रिया उद्योग उभा केल्यास जिल्ह्यातील हजारो बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध होईल व जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात कारखाना उभा करण्यात यावा अशी मागणीही निलेश अंबादे यांनी विधानसभा अध्यक्षाची नागपूर येथे भेट घेऊन निवेदनात द्वारे केली आहे