ब्रम्हपुरी येथील सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्था ब्रम्हपुरी र.नं. ३५२ च्या वतीने खरीप हंगाम आधारभूत धान खरेदी केंद्राचा शुभारंभ २३नोव्हेंबर रोजी सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्थेचे उपाध्यक्ष ईश्वर ज.सहारे यांच्या हस्ते करण्यात आले.ब्रम्हपुरी शेतकी खरेदी विक्री सहकारी संस्थेअंतर्गत खरीप हंगामातील धान उत्पादक शेतकऱ्यांचा धान खरेदी करण्यात येणार आहे.
आधारभूत धान खरेदी केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी चंद्रपूर जि. मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष दामोधर श्रा. मिसार ,उपाध्यक्ष ईश्वर सहारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्थेचे संचालक प्रभाकर सेलोकर,दिपक उराडे, विनोद कावळे,केशव भुते, अन्नाजी ठाकरे, मधुकर राऊत, केशव करंबे, प्रेमानंद मेश्राम, शामराव दिघोरे, संस्थेचे व्यवस्थापक किशोर बगमारे,सुरज दोनाडकर,लोकमान राऊत,महेश ढोरे, गोसावी पिलारे, सुनिल राखडे यांच्यासह अन्य गावातील प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्थित होते.
धान खरेदी प्रति क्विंटल २१८३ रुपये भावाने करण्यात येणार आहे. मागील वर्षी २०४० रुपये प्रति क्विंटल धानाला भाव होता. यंदा प्रति क्विंटल १४३ रुपये प्रमाणे दर वाढविण्यात आले आहे. धान खरेदी आनलाईन पद्धतीने झाली असून प्रत्येक शेतकऱ्यांचा सातबारा प्रथम नोंदणी झाल्यावर तो शेतकरी विक्री मर्यादेनुसार आपले शेतमाल विक्री करु शकतो. ऑनलाइन नोंदणीची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर सातबाराची ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन संस्थेचे व्यवस्थापक किशोर बगमारे यांनी केले आहे.