वाशिम/कारंजा (संजय कडोळे कडून) : भटक्या विमुक्ताच्या शेकडो संघटना असल्या तरी त्याचा तळागाळातिल, खेड्यापाड्यातील गोरगरीब, पालावर राहणाऱ्या आणि उपासमारीशी झुंज देणाऱ्या कोणत्याच खऱ्या खुऱ्या गरजू भटक्या विमुक्ताला फायदा होतांना दिसत नाही. आमच्या विदर्भातील आणि प्रामुख्याने यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघातील स्वतःला भटक्या विमुक्त समाजाचे तथाकथीत नेते संबोधणारे, बंगल्यामध्ये राहून केवळ त्यांच्या एका जाती करीता संघर्ष करून, निवडणूका आल्या की, विकले जातात आणि संधी मिळाली की, सत्तेत सहभागी होतात. हे या समाजाचे दुदैव आहे. तळागाळातील पालावर राहणाऱ्या भटक्या विमुक्तांचा यांनी केव्हाही विचार केला नाही . किंवा त्यांना यांचे सोयर सुतकही नाही ही वस्तुस्थिती आहे. आम्ही महाराष्ट्र भटक्या व विमुक्त जाती संघातर्फे पहिले अधिवेशन १९९१ ला व द्वितीय अधिवेशन दि २३ जून १९९२ ला मध्ये स्वराज्य भवन आणि प्रमिलाताई ओक हॉल अकोला येथे मा ना शरदरावजी पवार, भटक्या विमुक्तांचे पहिले आमदार स्व .दौलतराव भोसले, एन टी माने , बाबा भारती, स्व .बळीरामजी अवताडे यांचे उपस्थितीत दोन राज्यस्तरिय अधिवेशन, भटक्या विमुक्त जाती जमाती संघाद्वारे भरविले होते तेव्हा पासून पश्चिम विदर्भात केव्हाही अधिवेशन झाले नाही . त्यावेळी माझे सवंगडी, चित्रकथी समाजाचे स्व बळीरामजी अवताडे,गोसावी समाजाचे बाबा भारती, नाथ समाजाचे स्व वि ग नाथ, शिकलकर समाजाचे स्व तेहरसिंग टांक, गोंधळी समाजाचा मी स्वतः संजय कडोळे, स्व किसनराव शाहीर महाजन, स्व नामदेवराव मुदगल, अॅड श्रीरामजी , शिवकुमार लाघे इत्यादी आम्ही समाजाप्रती जागरूक होतो व समाजा करीता निःस्वार्थपणे संघर्ष करीत होतो . त्यावेळी आमचा राजकिय स्वार्थ नव्हता तर समाजाप्रती आमची आस्था होती . परंतु आता चालू दशकात तसे राहीलेले नाही . विकल्या जाणाऱ्या तथाकथित भटक्या विमुक्त नेत्यांमुळे आज या समाजाची वाईट परिस्थिती झालेली आहे , असे नेते राजकारणात जाऊन . आमच्या टाळूवरचे लोणी खात आहेत . भटक्या विमुक्ता करीता केन्द्रशासनाने नेमलेल्या रेणके आयोगाच्या अहवाल व शिफारशी वर निर्णय होऊन कोणत्याच प्रकारची अंमल बजावणी होत नाही व भटक्या विमुक्तांना न्याय मिळत नाही . आज शिक्षण क्षेत्रात केवळ बोटावर मोजण्या एवढे आरक्षण भटक्या विमुक्तांना आहे परंतु दुदैवाने राजकिय क्षेत्रात मात्र कोणत्याही प्रकारचे आरक्षण आम्हाला नाही. आमची स्वतंत्र्य जनगणना होत नाही . मंत्रालयातील नोकर्यात स्थान नाही. आमच्या समाजाचे दुदैव म्हणजे आजही गावकुसाबाहेर पालावर किंवा तांड्यावर आमच्या परिवाराला रहावे लागते . पोटासाठी म्हणजेच उदरनिर्वाहा करीता आम्हाला गावोगाव भटकंती करावी लागते . आणि दुदैव असे की कोठे काही गुन्हा घडला तर पोलिसांच्या काळ्या यादीत आमच्या भटक्या समाजाचे नाव टाकले जाते . आमच्या समाजात भटकंती मुळे अशिक्षितांचे प्रमाण जास्त आहे भटकंती मुळे बऱ्याच लोकाकडे मतदान कार्ड, आधारकार्ड नाहीत ही वस्तुस्थिती आहे . त्यामुळे पालावर, तांड्यावर रहाणाऱ्या आमच्या समाजाला संबधित पोलिस यंत्रणा व तहसिलदार यांनी ओळखपत्र देणे जरूरी आहेत . तसेच आमच्या समाजा करीता प्राधान्याने घरकुल योजना, रोजगार योजना राबविणे जरूरी आहे . मागे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने आमच्या समाजतिल, सामाजिक कार्यकर्त्यांकरीता, कै वसंतराव नाईक समाजभूषण पुरस्कार घोषीत केला होता परंतु तो पुरस्कार ही बंद करण्यात आला आहे . म्हणजेच तात्पर्य असे की, आमच्या भटक्या विमुक्ताकडे शासनाचे १००% दुर्लक्ष्य आहे . आणि भटक्या विमुक्तांच्या महाराष्ट्रातील हजारो संघटना ह्या राजकारणापुरत्या मर्यादित असून, तळागाळातीला भटक्याच्या समस्याचे त्यांना कोणतेही सोयर सुतक नाही . आणि आमचेसाठी मंत्रालयात आवाज उचलणार एखादा मंत्री किंवा आमदार आमचेसाठी कायदा करायला पुढे येत नाही .अशी खंत कारंजा येथील भटक्या विमुक्त समाजाचे कार्यकर्ते महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त संजय कडोळे यांनी प्रसार माध्यमाशी बोलतांना व्यक्त केली आहे .