तुमसर तालुक्यतील माडगी येथे घराजवळील स्लॅबवर खेळताना एका दहा वर्षीय मुलाच्या हातातील सळाकीचा संपर्क उच्च दाबाच्या वीज ताराला झाल्याने चिमुकला विद्यार्थी गंभीररीत्या भाजला. शिवम जयराम नगरधने (१०, रा. माडगी) असे विद्यार्थ्याचे नाव आहे. शिवम हा त्याच्या घराजवळील स्लॅबवर खेळता खेळता सलाख त्याने हातात घेतली. स्लॅबवरून ३३ के. व्ही. विजेच्या तारांच्या संपर्कात लोखंडी सळाख आल्याने शिवमला विजेच्या जोरदार धक्का बसला. त्याचा कमरेखालील भाग गंभीररीत्या भाजला.