कृषीगंगा पाणी वापर संस्था गांगलवाडीची हंगामी मासिक सभा व हंगामी आमसभा दिनांक 28 जून रोज शनिवारला दुपारी 1 वाजता संस्थेचे अध्यक्ष प्रा.रामलाल महादेव दोनाडकर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी गोसेखुर्द उजवा कालवा विभाग ब्रम्हपूरी उपविभाग क्र.8चे श्री.विजय गिरासे साहेब,सहाय्यक अभियंता श्रेणी- 2,श्री.विनोद वाघाडे कम्युनिटी मोबिलायझर गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, श्री.शुभम प्रधान फिल्ड को-ऑर्डिनेटर गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
संचालक मंडळामध्ये राजेश्वर मगरे, सहदेव दोनाडकर,बाजीराव अलोने,गजानन मैंद,वनिता दोनाडकर,ढोरे,तसेचे संस्थेचे सचिव सूरज दोनाडकर आणि नंदकिशोर दोनाडकर अध्यक्ष पाणी वापर संस्था बरडकिन्ही,मनोहर मिसार सचिव पाणी वापर संस्था बरडकिन्ही,सुनील दोनाडकर,टिकाराम माकडे, रवींद्र मैंद,पत्रकार गुलाब ठाकरे इत्यादी मान्यवरांसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेत अनेक विषयांवर चर्चा झाली. उपस्थित शेतकरी आणि पाणी वापर संस्थेचे संचालक मंडळांनी यंत्रणे विषयी विविध प्रश्न विचारून समाधान करून घेतले.यामध्ये नवीन पाईपलाईन बद्दल काही समस्या असल्यास मला तात्काळ कळवावे.शेतकरी सदस्य नोंदणी करण्यास सुरुवात करावी. पाणीपट्टी कशी आकारावी याबद्दलची माहिती. संस्थेचे कार्यालय अद्यावत करण्याबाबतच्या सूचना. यावर्षीच्या हंगामात पाणी सोडण्याच्या प्रक्रियेवर भर.. यासह अनेक विषयांवर सर्वंकष चर्चा झाली.तद्ववतच विजय गिरासे साहेबांनी काही मार्गदर्शक सूचना संस्थेच्या संचालक मंडळाला दिल्या. त्यामध्ये वापर संस्थेने विभागाकडे पाणी मागणी लवकरात लवकर करावी.पाणिपट्टीचे दर ठरविण्यात यावे.उपस्थित सर्वांचे आभार संस्थेचे अध्यक्ष रामलाल महादेव दोनाडकर यांनी मानले.