कारंजा : गेल्या अनेक वर्षांपासून, कारंजा-मानोरा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार आणि भाजपा जिल्हाध्यक्ष आ. राजेंद्रजी पाटणी यांच्या मार्गदर्शनात भाजपा करीता तन मन धनाने कार्यरत असतांना ज्यांनी पक्षाकरीता स्वतःचे जीवन समर्पित केले आहे.
तसेच कारंजा येथे भाजपा संघटन वाढवून, केवळ युवकांमध्येच नव्हे तर संपूर्ण कारंजेकर नागरिकांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवीली. अशा लोकप्रिय नेतृत्वाला येत्या, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजेच नगर पालिकेच्या निवडणूकीत उमेदवारी मिळाल्यास निश्चितच त्या संधीचे सोने होऊन, ललितजी चांडक हे प्रचंड मताधिक्याने निवडून येतील. व त्यांच्या माध्यमातून कारंजा नगरीचा विकास साधला जाईल असे उद्गार ललित चांडक यांचे बालसवंगडी वर्गमित्र तथा ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी यावेळी काढले आहेत. याबाबत अधिक वृत्त असे की, गेल्या शनिवारी कारंजा येथील शहर भाजपाचे लोकप्रिय अध्यक्ष ललित चांडक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्थानिक विदर्भ लोककलावंत संघटना तथा साप्ताहिक करंजमहात्म्य परिवाराकडून, संजय कडोळे,उमेश अनासाने, प्रदिप वानखडे,डॉ.ज्ञानेश्वर गरड, नंदुभाऊ कव्हळकर,उज्वल देशमुख ,कैलाश हांडे आदी, संस्थेच्या कलावंत मंडळींनी भाजपा शहराध्यक्ष ललित चांडक यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. यावेळी संस्थेतर्फे पुष्पगुच्छ व सदिच्छा भेट देत त्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला.
लहानपणीचे बालसवंगडी आणि शाळेत वर्गमित्र असणाऱ्या ललित चांडक आणि संजय कडोळे यांनी एकमेकांना आलिंगन दिले असता आनंदाने त्यांना आनंदाश्रू आल्याचा प्रत्यय दिसून आला जणू कृष्ण (ललित चांडक) सुदाम्याची (संजय कडोळे ) ह्या हृदयीचे त्या हृदयी कळणारे कृष्ण आणि सुदामा. अगम्य सखये.मनात लालसा ठेवून घेतलेली भेट, ती भेट कसली ? ते मैत्र कसले ? पण सुदामा वेगळाच. म्हणून तर सुदाम्याचे मित्रपंक्तित स्थान श्रेष्ठ. भेटीला येणारा सुदामा निर्लोभी, पारदर्शी.मित्राने न मागता मित्राचे हृदय जाणून अनंत हस्ते देणारा तो सखा श्रीकृष्ण.दोघेही अलौकिक. दोघांमधले मित्र प्रेम न भूतो न भविष्यती असे. गरीबाचे सुदाम्याचे पोहे श्रीकृष्णाला अतिशय चविष्ट लागतात.या पोह्यांच्या प्रत्येक कणात श्रीकृष्णाला प्रेम,प्रिती, वात्सल्य,माया,ममता अशा कितीतरी भावनांची अनुभूती मिळते.अशा कितीतरी भावनांच्या लाटा सुदामा आणि कृष्ण सखा च्या गळाभेट दरम्यान मनात उचंबळून आल्या.
असे करंजमहात्म्यचे सहसंपादक उमेश अनासाने यांनी कळवीले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....
=================================
Post Views: 345