कारंजा.महाराष्ट्र गवली समाज संघटना, कारंजा जिल्हा वाशिम कडून, शिक्षक पुरस्कार प्राप्त शेख मन्नान सर रायलिवाले यांचे पुत्र रेहान शेख मन्नान, रा.कारंजा गवलीपुरा यांना एमबीबीएस मध्ये प्रवेश मिळाल्याबद्द्ल गवलीपुरा ताज चौक येथे शॉल व पुष्पगुच्छ देऊन रेहानशेख मन्नान यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी गवळी समाज संघटन विदर्भ ख्यातिप्रमुख प्रा. सी.पी.शेकुवाले,मा. वाशिम जिलाध्यक्ष व कारंजा बार एसोसिएशन अध्यक्ष एड. सुभान खेतिवाले, मा. जिलाध्यक्ष रहमान नंदावाले, मा. जिलाध्यक्ष कय्यूम जट्टावले, जिल्हा उपाध्यक्ष चाँद मुन्नीवाले, वाशिम जिल्हा सचिव सुभान चौधरी, जिल्हा कोषाध्यक्ष वकील गारवे, जिल्हा संघटक मोहम्मद मुन्नीवाले, युसूफ खेतीवाले सर, मा. शहर अध्यक्ष सलीम शेकुवाले, रमजू खेतिवाले, यूसुफ मौलाना मुन्नीवाले, इमाम भवानीवाले, यूसुफ हीरा खेतीवाले, आदींसह संघटनेचे सदस्य प्रमुख उपस्थित होते. असे वृत्त जिल्हा संघटक मोहम्मद मुन्निवाले यांनी महाराष्ट्र साप्ता . ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांना कळविले आहे .