अकोला... लहूसेना फाउंडेशन अकोला घ्या वतीने मातंग समाजाच्या मागण्या पुर्ण करण्यासाठी मा. मुख्यमंत्री न्याय द्या एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मातंग समाजाच्या खालील प्रमुख मागण्या होत्या.
1. बार्टी मार्फत पोलिस, मिलटरी भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी निवड केलेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण पुर्ण होणेपुर्वीच दुबार प्रशिक्षणाचे कारणे दाखवून कमी करण्यात आले त्यामुळे शैक्षणिक नुकसान होत असल्याने त्यांना त्वरित प्रशिक्षणासाठी रुजू करून त्यांना शासनाकडून स्टायपेंड देण्यात यावे.
2. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत कर्ज मंजूर झालेले लाभार्थ्यांना शासकीय जमानतदार, व 7/12 जमानतदाराची अट रद्द करुन 31 मार्च 2025 च्या आंत कर्जाचे वाटप करण्यात यावे.
3. अकोला जिल्ह्यातील भूमिहीन मातंग समाजातील कुटुंबाला अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचे सबलीकरण स्वाभिमान योजनेमध्ये समाविष्ट करून व लाॅटरी बंद करून तालुक्यामध्ये जेथे जमीन उपलब्ध होईल त्या ठिकाणी जमीन विक्रेत्याच्या पसंतीच्या लाभार्थ्यांना तात्काळ जमीन देण्यात यावी.
4. तीन अपत्त्याचा शासनाचा निर्णय हा शासकीय नोकरदार व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक लढविणाऱ्या उमेदवारास सारखाच म्हणजे 2005 किवा 2001 पैकी एक कोणताही समान कायदा लागू करण्यात यावा.
5. सन 1982 ते 1986 मध्ये मौजे लोणी गट क्रमांक 51 व गट क्रमांक 33 दधम परिसरातील शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याबाबत १४ दिवसाची न्यायालयीन कोठडीत जेल झाली त्या कुटुंबाला दादासाहेब गायकवाड स्वावलंबी सबलीकरण स्वाभिमानी योजने अंतर्गत समावीष्ट करून त्यांना शासनाकडून जमिनी देण्यात यावी.
6. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त समाजसेवकांना दरमहा 5000 रुपये मानधन देण्यात यावे.
7. अकोला जिल्ह्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ कार्यालय हे सामाजिक न्याय भवन अकोला येथे सुरू करण्यात यावे. इत्यादी मातंग समाजाच्या मागण्या पुर्ण करण्यासाठी मा. मुख्यमंत्री न्याय द्या हे एक दिवशीय धरणे आंदोलन लहूसेना फाउंडेशन मातंग समाज संघटनेच्या दि. 27/2/2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे करण्यात आले. यामध्ये मातंग समाज कार्यकर्ते रामदास तायडे, गजानन दांडगे, सुनंदाताई चांदणे, गजानन तायडे, दिनकर रणबावळे, उमाताई अंभोरे, नारायण मानवतकर, गोकुळ मानकर, भुपेंन्द अ़भोरे, पुष्पाताई अंभोरे, सुनील अवचार, सुभाष इंगळे, गोपाल गायकवाड, रवि खडसे, आंदोलनाला पाठिंबा प्रमोद देंडवे जिल्हाध्यक्ष तथा मिलिंद इंगळे वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा प्रकाश तायडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव. कामगार नेते शैलेश सूर्यवंशी कामगार संघटना महाराष्ट्र प्रदेश संघर्ष दीप प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अनुराधाताई ठाकरे.प्रतिभाताई अवचार, बारा बलुतेदार संघटनेचे अध्यक्ष गजाननराव वाघमारे दिलीप भाऊ शिंदे गणेश पारसुदकर
आपल्या प्रतिक्रिया द्या....