ब्रम्हपुरी:-
आशा व गट प्रवर्तक यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी आयटकच्या नेतृत्वात आज आरोग्य भवन, मुंबई येथे निवेदन सादर करण्यात आले.
या चर्चेत आयटकचे राज्य सचिव कॉ. विनोद झोडगे यांच्या नेतृत्वाखाली प्रतिनिधींनी मा. आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे व डॉ. कमलेश भंडारी (सहाय्यक आयुक्त, आरोग्य सेवा तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान) यांची भेट घेऊन निवेदन दिले.
निवेदनात पुढील मागण्या मांडण्यात आल्या :
गट प्रवर्तकांना कंत्राटी कर्मचारी दर्जा द्यावा.
आशांना ऑनलाईन कामाची सक्ती रद्द करावी.
आशा व गट प्रवर्तकांचे सेवानिवृत्ती वय ६५ वर्षे करावे.
सरकारच्या घोषणेनुसार दिवाळी बोनस (भाऊबीज) द्यावा.
केंद्र सरकारकडील जून महिन्यापासूनचा थकित मोबदला त्वरित द्यावा.
पंतप्रधान मातृत्व योजना कामाचा 2022 पासूनचा थकित मोबदला द्यावा.
आशांना मोबदल्याबाहेरील कामे लादणे थांबवावे.
आशा व गट प्रवर्तकांना सन्मानाची वागणूक द्यावी.
या वेळी आयुक्त डॉ. बलकवडे यांनी सांगितले की,
राज्य सरकारने जुलै महिन्याचा वाढीव मोबदला जिल्हास्तरावर वळती केला असून ४-५ दिवसांत तो बँक खात्यात जमा होईल.
ऑगस्ट महिन्याचा वाढीव मानधन लवकरच जिल्हास्तरावर पाठवला जाईल.
केंद्र सरकारकडील थकित मोबदला मिळवण्यासाठी पत्रव्यवहार सुरू आहे.
आशा व गट प्रवर्तकांचे सेवानिवृत्ती वय ६० वरून ६५ वर्षे करण्यासाठी चर्चा सुरू असून, विविध प्रलंबित मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी आरोग्य भवन, मुंबई येथे लवकरच संघटनेसोबत बैठक घेण्यात येईल.
निवेदन देताना कॉ. विनोद झोडगे पाटील (राज्य उपाध्यक्ष), कॉ. मुगाजी बुरुड (उपाध्यक्ष), कॉ. भगवान पाटील (राज्य संघटक, कोल्हापूर), कॉ. शिवम पांचाळ (हिंगोली) उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....