कारंजा (करंजमहात्म्य वृत्तसेवा) आत्ताच मिळालेल्या वृत्तानुसार, आपल्या वाशिम जिल्ह्यात येत्या चोवीस तासात,रात्रीबेरात्री मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या कोसळधारा कोसळून, अतिवृष्टी होण्याची शक्यता असून,भारतिय हवामान विभाग नागपूर कडून,वाशीम जिल्ह्यात नुकताच रेड अलर्ट घोषीत करण्यात आला असल्याचे कळते.पावसात विद्युत पुरवठा खंडीत होण्याची सुद्धा शक्यता असते.त्यामुळे नदी आणि नाल्याच्या काठावर राहणाऱ्या ग्रामिण भागातील नागरिकांनी अधिक सतर्क राहणे अत्यावश्यक आहे.कृपया विजा कडाडत असतांना कुणीही शेतातील वाड्या वस्तीत,झाडाखाली आश्रय घेऊ नका.नदी किंवा नाल्याच्या प्रवाहातून,पांदन रस्त्याने जाऊ नका.आपली वाहनं (दुचाकी चार चाकी, बैलगाड्या आणि जनावरे) प्रवाहाच्या पाण्यातून बाहेर काढण्याची जोखीम घेऊ नका.विजा कडाडत असतांना तुमचे इलेक्ट्रानिक साधन, दूरदर्शन,टि व्ही, मोबाईलचे नेट बंद करून ठेवा. विजा कडाडत असतांना फोनवर एकमेकांशी संवाद करू नका. असे आवाहन महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळविले आहे.