तालुक्यातील आटमुर्डी ग्रामपंचायतीचे सरपंच विठ्ठल नथुजी जोगी हे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14 एक (ह) चे उल्लंघन केले असल्याने सदस्य व सरपंच पदासाठी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी अपात्र ठरविण्यात आले असल्याने ते सरपंच पदावरून पायउतार झाले आहे .
सदर गावातील व्यक्ती कमलाकर पाकमोडे यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे 2021-22 या वर्षाच्या काळात कराची रक्कम मागणी बिल प्राप्त झाल्यानंतर 90 दिवसाच्या आत भरले नसल्याच्या तक्रार दाखल केली होती त्या प्रकरणात 356 रुपये ग्रामपंचायत कार्यालयाकडे 27 जून 2021 मध्ये मागणी नोटीस बजावल्या प्रमाणे भरले नाही. सदर रक्कम 90 दिवसांच्या आत भरणे आवश्यक होते परंतु त्यांनी नव्वद दिवसानंतर भरले व त्यामुळे कायद्याने जोगी यांनी कसूर केले असल्याची खात्री जिल्हाधिकारी चंद्रपूर यांची झाली असल्याने एक एप्रिल 2022 रोजी विठ्ठल जोगी यांना जिल्हाधिकारी यांनी निरर्ह ठरवले असल्याचा आदेश नुकताच पारित केला असून त्यांच्याकडे कोणताच अधिकारी राहिला नसल्याचे समजते.
तक्रारदाराच्या वतीने एड.अविनाश ठावरी यांनी काम पाहिले.