भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक सेलची ब्रम्हपुरी तालुका कार्यकारिणी नुकतीच गठीत करण्यात आली. यामध्ये नियुक्ती झालेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहेत.
यामध्ये अल्पसंख्याक सेलच्या ब्रम्हपुरी तालुका उपाध्यक्षपदी तबरेज वहाब शेख (शानु), सचिवपदी इरफान अली सय्यद, सोशल मीडीया प्रमुख म्हणून फैजान नासीर शेख, ग्रामीण उपाध्यक्षपदी नौशाद करीम शेख, सहसचिवपदी मुस्तफा अमानत शेख, तर कोषाध्यक्षपदी राशीद खान पठाण यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहेत.
सदरचे नियुक्तीपत्र देतांना ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष मोहसीन कुरेशी, जि.प. सदस्य प्रा. राजेश कांबळे, नगरपरिषदेचे गटनेता विलास विखार, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रभाकर उर्फ सोनू नाकतोडे, शेतकरी सल्लागार समितीचे सदस्य किशोर राऊत, नांदगाव ग्राम काॅंग्रेसचे अध्यक्ष जितेंद्र ठाकरे हे यावेळी उपस्थित होते.